प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी धडक मोहीम हाती घेवून एकूण 514 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात 23-भिवंडी, 24-कल्याण व 25-ठाणे लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलीस विभागाकडून जिल्ह्यात चोख बंदोबस्त सुरू आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होवू नये, यासाठी पोलीस विभागाने अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजे 16 मार्च 2024 पासून ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत पोलिसांनी विविध मोहिमेत एकूण 514 गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार 5 गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईचे 78 तर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी 46 गुन्हे दाखल झाले आहेत.
24-कल्याण लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार 25, प्रतिबंधात्मक कारवाईच्या 211, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी 72 आणि एक इतर गुन्हे दाखल झाले आहेत.
25-ठाणे लोकसभा मतदारसंघात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार 9, प्रतिबंधात्मक कारवाईचे 30 आणि आर्म अँक्टसंबंधीचे 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यात केलेल्या कारवायांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईचे एकूण 319 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये 5 हजार 531 लिटर दारु, 241 एमएल (71 हजार 330 लिटर वॉश), किंमत- रुपये 30 लाख 85 हजार 130, रोख रक्कम 26 हजार 660 रुपये आणि 1 टेम्पो, 1 कार, 1 मोबाईल आणि 1 मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण 155 गुन्हे दाखल करण्यात आले असून 138 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 11 पिस्टल, 2 रिव्हॉल्व्हर, 9 गावठी कट्टे, 1 एअर गन, असा एकूण 7 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 48 जिवंत काडतुसे (किंमत- रु.11 हजार 950), 149 कोयता, चॉपर, चाकू, सुरा, तलवार, किंमत रु. 35 हजार 275, 10 मोबाईल व 9 वाहनेही जप्त करण्यात आले असून 900 रु. रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.
अंमली पदार्थविरोधी कारवाईत एकूण 39 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2.860.12 किलोग्रॅम एमडी पावडर (किंमत – रु.27 कोटी 82 लाख 49 हजार 202), कोकीन पावडर 27.05 ग्रॅम (किंमत- रु.11 लाख), गांजा 37 किलो 273 ग्रॅम जप्त करण्यात आला आहे.