Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रसैनिक फेडरेशन वर्धापन दिन व कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा

सैनिक फेडरेशन वर्धापन दिन व कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी : आज सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांचा वर्धापन दिन सोहळा आणि कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत* यांनी भूषविले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण दरेकर कर्नल डी.राजा , आमदार मनीषा कायंदे सामाजिक कार्यकर्त्या शायना एन सी, निवासी जिल्हाधिकारी, सुप्रसिद्ध राष्ट्रपती पुरस्कार विजेते मराठी कलाकार अरुण नलवडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती रेडेकर, नितीन मोरे अध्यक्ष जय भीम आर्मी, अमोल जाधवराव अध्यक्ष शिवराज्य ब्रिगेड, दिलीप पाटील, अनघा बेडेकर अध्यक्ष बेडेकर लोणचे उपस्थित होते. माननीय आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात सैनिकांसाठी आरामगृह – मुंबई मध्ये उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी श्री. समीर वानखडे यांनी देशातील ड्रग्सविरोधी मोहिमेबाबत माहिती दिली आणि सैनिक या लढ्यात कशी भूमिका बजावू शकतात हे विषद केले. या कार्यक्रमांमध्ये खास करून नागरी निवारा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गोरेगाव यांच्या वतीने १०,०००/ रुपयाची देणगी सैनिक फेडरेशनला देण्यात आली.तसेच
मारुती पाटील यांच्यातर्फे ५१११ रुपयाचा चेक देण्यात आला.

या वेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमास सैनिक फेडरेशनचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होते. सुभेदार सुभाष दरेकर – उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन, कॅप्टन सुभाष चव्हाण – सचिव, महाराष्ट्र राज्य, रवींद्र घनबहादुर – सचिव, उद्योग विभाग, सरदार चोपडे, सचिव महाराष्ट्र राज्य, शत्रुघ्न महामुडकर – सचिव, महाराष्ट्र राज्य, शंकर वडकर – जिल्हाध्यक्ष, वाशिम, युसुफ ख्वाजा – सचिव, अकोला
, राजू पाटील – जिल्हाध्यक्ष, ठाणे, निलेश पाटील – जिल्हाध्यक्ष, पालघर, श्रीमती शोभा गरंडे – महिला ब्रिगेड, ठाणे, श्रीमती सुप्रिया उतेकर – जिल्हाध्यक्ष, महिला ब्रिगेड, मुंबई, फ्लेचर पटेल – जिल्हाध्यक्ष, मुंबई विजय जगताप – जिल्हाध्यक्ष, रायगड, पोपटराव दाते, धोंडी राहुल, सोपान जाधव, आशिष पाटील, आनंद पवार, संजय दळवी – संघटक, अरविंद गव्हाणकर
कारगिल विजय दिवसानिमित्त या ठिकाणी विविध संघटना व सामाजिक संघटना यांनी सुद्धा भाग घेतला. यामध्ये युनायटेड एक्स सर्विस मॅन बदलापूर चे अध्यक्ष आबा बांदेकर व त्यांची टीम उपस्थित होती. भारतीय एक्स सर्विस मॅन लीगचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे सामाजिक संघटना पंचरत्न मित्र मंडळ व युथ कौन्सिल उपस्थित होते. सैनिक फेडरेशन मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. तसेच ठाणे, पालघर, रायगड, अकोला, वाशिम, अमरावती, सातारा, कोल्हापूर, नवी मुंबई आणि मुंबई जिल्ह्यांतील सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments