सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर दिसू लागलेले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केली. त्यामध्ये शिवसेना पक्ष बांधणी व नवीन पदाधिकारी नियुक्तीने सध्या सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे झंजावत दिसत आहे. यामुळे नव्या जुन्या शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
पावसाळ्याच्या आगमनानंतर जो वेध लागतो. तो आखाडीकडे परंतु, आखाडी संपल्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते . नैसर्गिक नवीन पालवी फुटते. त्याप्रमाणे शिवसेनेलाही नवीन पालवी फुटलेली आहे. अनेकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्या हाती धनुष्यबाण देण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ही हम भी कुछ कम नही… हे दाखवून दिलेले आहे. शिवसैनिकांपेक्षाही शिवरागिनींची सातारा शासकीय विश्रामगृहांमधील शिवसेनेचे बैठकीसाठी झालेली गर्दी ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला शिवसेनेचा धनुष्यबाण पोहोचवण्यास अनुकूल वाटत आहे.
शिवसेना महिला आघाडी सातारा जिल्हा प्रमुख शारदा जाधव, संगीता पवार, विद्या बर्गे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, विराज खराडे, विजय पाटील, बाळासाहेब मुलाणी , प्रा .विश्वंभर बाबर, बाळासाहेब जाधव, महेश गोडसे, अजित बनसोडे, मयूर बागल, अविनाश फडतरे, हेमंत सुतार ,सुभाष पवार, ज्ञानेश्वर काटकर यांच्यासह अनेक निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी राहिली. आज हिंदुत्वाच्या आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात शिवसेनेने आपल्या अस्तित्व दाखवून दिले आहे. नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षात काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यासाठी आग्रही भूमिका सर्व शिवसेना नेते घेणार आहेत. असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये शिवसेना सामील असल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्कप्रमुख, शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानणारा शिवसैनिक खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवणार आहे.
सातारा जिल्ह्यातील खासदार व आमदार बनवणाऱ्या शिवसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकतीने उभे राहावे. असा नेत्यांनी आदेश दिलेला आहे. फलटण- कोरेगाव- माण- खटाव मतदार संघामध्ये दोन लाख शिवसैनिकांची नोंद झाली आहे . येत्या श्रावण महिन्यात आणखीन सातारा जिल्ह्यातील काही भागात पन्नास हजार क्रियाशील सभासद करण्यासाठी अर्ज वाटप करण्यात आले आहेत. हे अर्ज कमी पडतील. अशी राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. शिवसेना संघटना खऱ्या अर्थाने आता सातारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पोहचली असल्याचे चित्र दिसत आहे.
जावळी, पाटण, कराड, कोरेगाव, खटाव, खंडाळा, माण, फलटण , महाबळेश्वर , सातारा, वाई तालुक्यातून आलेल्या शिवरागिनी व शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृह परिसर भगवेमय केल्याचे दिसून आले. यावेळी नव्याने नियुक्ती केलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
____________₹___________
फोटो– सातारा शासकीय विश्राम ग्राम मध्ये नियुक्तीपत्र देताना शिवसेना पदाधिकारी व महिला शिवरागिनी (छाया– अजित जगताप, सातारा)