Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्र....आता मुंबईचा पाणीपुरवठा टंचाई दूर धरण भरले

….आता मुंबईचा पाणीपुरवठा टंचाई दूर धरण भरले

मुंबई प्रतिनीधी : मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा व भातसा धरण मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे भरून वाहू लागले. आता मुंबई ची पाणी चिंता मिटली आहे. महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे.

धरणाचे बांधकाम १९६९मध्ये सुरू झाले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरू झाले त्यावेळी १४ कोटी रुपये एवढाच खर्चाचा अंदाज होता. इ.स.१९७३पर्यंत कामाची गती फार कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर १९८३पर्यंत हया प्रकल्पाचा खर्च ८० कोटी रुपयांवर तर १९९४-९५पर्यंत हा खर्च ३५८ कोटी रुपयांवर पोहचला. २००० सालापर्यंत काम पूर्णावस्थेला आले.

मुंबई शहराचा ५० टक्के(१३५ कोटी लिटर) पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. विहार, तानसा, आणि वैतरणा या धरणांतून उरलेले ५० टक्के पाणी उचलले जाते. महाराष्ट्रातील दगडी धरणांमध्ये भातसा धरण सर्वात उंच आहे.
बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची : ८९ मीटर (महाराष्ट्रात सर्वोच्च)
लांबी : ९५९ मीटर
एकूण बांधकाम : ५,१८,००० घनमीटर
एकूण खोदकाम : ७०,५३० घनमीटर
तानसा धरण, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक आहे. हे धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. १८७२ ते १८९० दरम्यान हे धरण बांधले गेले. तानसा नदीवर हे धरण असून त्याची पाणी साठवण क्षमता २०८ दशलक्ष घनफूट
उद्देश: मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
स्थान: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका.
नदी: तानसा नदी.
बांधकाम वर्ष: १८७२-१८९०.
पाणी साठवण क्षमता: २०८ दशलक्ष घनफूट.
ओव्हरफ्लो: जोरदार पावसामुळे धरण पूर्ण भरल्यावर त्याचे पाणी ओव्हरफ्लो होते, ज्यामुळे मुंबईला दिलासा मिळतो.
महत्व: मुंबई शहरासाठी हे एक महत्वाचे पाणीस्रोत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments