तळमावले/वार्ताहर : महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे कर्मवीर सभागृहात माननीय प्राचार्य सौ.मुल्ला एन ए यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय रेखा कला परीक्षा सहविचार सभा संपन्न झाली प्रास्ताविक श्री.दीपक शिंदे सर हुमगाव यांनी केले. विद्यालयातील कलाशिक्षक श्री कचरे बाळासाहेब यांनी परीक्षा संदर्भात संपूर्ण माहिती ऑनलाईन पद्धतीने सहभागी 22 शाखांना रजिस्ट्रेशन करण्याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष प्राचार्य सौ.मुल्ला मॅडम यांनी पाचवड केंद्रातील अडीअडचणी विषयी सर्व विषयांची सविस्तर चर्चा केली. परीक्षा योग्य पद्धतीने पार पाडण्याचे सर्वांना आवाहन केले. संपूर्ण परीक्षा नियोजन बद्द पार पडण्याविषयी सविस्तर चर्चा *झाली.
*सर्व कलाशिक्षकांनी वाढीव फी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.**
विद्यालयातील तंत्रस्नेही शिक्षक श्री. जंगम शिवाजी यांनी सर्व 22 सहभागी शाळांचे रजिस्ट्रेशन वेळेत करून दिले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.तावरे मॅडम यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.अशा पद्धतीने शासकीय रेखाला परीक्षा सहविचार सभा अत्यंत खेळीमेळीच्या च्या वातावरणात संपन्न झाली.
महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे शासकीय रेखा कला परीक्षा सहविचार सभा संपन्न
RELATED ARTICLES