Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रजननायक विचार मंचाचे केंद्रीय कृषि राज्यमंत्र्यांनी केले कौतुक..

जननायक विचार मंचाचे केंद्रीय कृषि राज्यमंत्र्यांनी केले कौतुक..

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील सामाजिक जाण असलेले नेते आदरणीय श्री रामनाथ ठाकूर बाबूजी यांनी जननायक विचार मंच कामकाजाची माहिती घेऊन कौतुक केले. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सरकारचीच भूमिका मंच मांडत असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारी श्री संत सावता माळी पुण्यतिथी आणि लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्त दिनांक २३ जुलै रोजी जननायक विचार मंच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन कांबळे, मुंबईचे प्रेमानंद जगताप, तेलंगणा प्रदेशचे मुरलीधर देशपांडे, आंध्र प्रदेशचे ॲड अशोक कुमार, मुंबईचे अँड संजय गायकवाड, अनिल सुटे ,बालाजी भिंगारे, इंद्रजीत भिंगारे, अनिल भिंगारे यांच्यासह देशभरातून आलेल्या जननायक विचार मंच पदाधिकाऱ्यांनी कृषी राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर बाबूजी यांना महात्मा फुलेंची पगडी शाल व जननायक कपूरजी ठाकुरजी यांची प्रतिमा भेट दिली.

भारत देशाच्या विकासामध्ये जननायक विचार मंच सामील होत आहे. ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन मंच काम करत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय व उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याचे राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर बाबूजी यांनी कौतुक केले.
त्यावेळी अँड संजय गायकवाड, ॲड प्रेमानंद जगताप यांनी केलेल्या कार्याची ही माहिती घेतली . नवी दिल्ली येथील कृषी भवन मध्ये झालेल्या या भेटीच्या वेळी महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक हालचाली बाबतही चर्चा करण्यात आली. कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न होत आहे. काही त्रुटी व अडचणी असल्यास कृषी भवन येथे अथवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा. निश्चितच सकारात्मक सहकार्य मिळेल असे वातावरण निर्माण झाले आहे. अशी माहिती देण्यात आली.

___________________
केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांच्याशी वार्तालाप करताना जननायक मंच पदाधिकारी (छाया– निनाद जगताप, नवी दिल्ली)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments