Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रजावळीतील महू धरण पर्यटकांसाठी कधी मोकळा श्वास घेणार?

जावळीतील महू धरण पर्यटकांसाठी कधी मोकळा श्वास घेणार?

कुडाळ(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात मध्ये पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. त्यासाठी सार्वजनिक मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजप नेते वसंतराव मानकुमरे आणि दत्ता गावडे,अशोक गोळे, राजू गोळे यांच्यासह अनेक स्थानिक भूमिपुत्र व धरणग्रस्त प्रयत्न करत आहेत. सध्या महू धरणाचे पाण्याची पातळी वाढली आहे. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्रांच्या पर्यटनाच्या सुख सुविधाची ही मागणी जोर धरू लागलेली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास खऱ्या अर्थाने महू धरण मोकळा श्वास घेईल. याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.
१९९६ साली सेना – भाजप युती सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली . सातारा जिल्ह्यात काही धरण प्रस्तावित केले. त्यापैकी महू आणि हातगेघर धरण अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याच्या माध्यमातून पाणी पोहोचले नाही. याला सर्वस्वी जवाबदार राजकीय नेते व धरणग्रस्त सुद्धा आहेत. कारण, धरणग्रस्तांनी भरभरून मतं दिल्यामुळे राजकीय पक्कड मजबूत झाली आहे. परंतु धरणग्रस्तांची पक्कड सैल झाली आहे.
महू व हातगेघर धरणामुळे पर्यटकांना आनंद मिळणार आहे. त्या धरणाच्या पायथ्याशी आता रिकाम्या बाटल्या व प्लॅस्टिक, लाकडी ओंडके तरंगू लागले आहेत. याकडे लक्ष देण्यास राजकीय कुस बदलणाऱ्या काही लोकप्रतिनिधींना वेळ नाही. पाटबंधारे विभागाकडे निधी नाही. या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीमुळे पर्यटकांना नागरिक सुविधा नाहीत .
या महत्वकांशी पर्यटन वाढीस चालना देणाऱ्या महू व हातगेघर धरण स्थळाला पर्यटकांनीच पाठ फिरवली आहे. आधी पुनर्वसन मग धरण.. आता काळ बदलला असून नागरी सुविधा नसल्या तरी स्थानिक भूमिपुत्र सहजरित्या अन्याय सहन करत आहेत. त्याचे स्मारक म्हणजे महू आणि हातगेघर धरणग्रस्त असे बोलले जात आहे. ज्यांनी धरणासाठी मोर्चे काढले होते .आज तेच काही महाभाग नेत्यांची पाठ राखण करत आहे. दोष तरी कुणाला द्यावा ? असा प्रश्न धरणग्रस्त विचारू लागलेले आहेत.
जावळी तालुक्यातील महू धरणाच्या परिसरात जल पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. त्याचबरोबर रोजगार उपलब्ध होऊन किमान २५० स्थानिकांना उदरनिर्वाह करता येणार आहे. पाचगणी नजीक असलेल्या या धरणामुळे आतापर्यंत पर्यटनाकडे लक्ष न दिल्यामुळे कोट्यावधी रुपयाचे हक्काचे उत्पन्न बुडाले आहे. हे आता युवा पिढीला मनापासून पटू लागलेले आहे. आता शासन दरबारी तेच तेच प्रश्न मांडण्याऐवजी या भागातील नेतृत्व बदल बदलल्याशिवाय महू व हातगेघर धरणाला न्याय मिळणार नाही. असे प्रगतीची वाट पाहणारे ज्येष्ठ धरणग्रस्त आवाज उठवू लागलेले आहेत. त्याला तरुणांनी साथ द्यावी. अशी मापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. २७ वर्षांमध्ये जेवढे धरणात पाणी साचले त्याहीपेक्षा अनेकांनी राजकीय भूमिका बदलली आहे. त्यामुळे राजकीय कचरा आता तरंगत आहे. तो स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. हे मात्र खरे आहे.

______________________
फोटो– दुर्लक्षितपणामुळे महू धरणाची झालेले अवस्था… (छाया– अजित जगताप सातारा)

सरकारच्या

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments