सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनिमित्त आलेल्या ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांना जनता दरबार व आदर्श संजय राऊत यांच्या बाकीच्या बाबत प्रश्न विचारला. यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित प्रश्न विचारणारांना चांगले फटकारले. त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झालेली आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय विविध शासकीय बैठकी साठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साताऱ्यात आले होते. त्यानंतर काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सातारा जिल्हा परिषदेमध्ये बदलांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करण्यात आले होते त्यामध्ये काही प्रमाणपत्र बोगस निघाली. याला सर्वस्वी आरोग्य विभाग व शिक्षण विभाग जबाबदार असून कारवाईबाबत टाळाटाळ होत आहे. याकडे तरी लक्ष वेधून सर्व राज्यातच दिव्यांग बोगस प्रमाणपत्र वितरित करण्याची रॅकेट असून ज्यांनी दाखले दिले आहेत ते दोषी असून त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याबाबत बारकाईने लक्ष आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. माजी विधानपरिषद सभापती व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मंत्री गोरे यांनी टिपणी केली. यावेळी त्यांनी ज्यांनी भाकीत केले आहे. त्यांना हा प्रश्न विचारायला हवा. असे सांगून त्यांनी प्रश्न उपस्थित करणारा सल्ला दिला. माण खटाव जनता दरबार बाबत आपण त्या भागात जाऊन थांबून माहिती घ्या. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या विकासात्मक कामांबाबत तसेच अनेक आंदोलन होत आहे. अशा वेळेला संबंधितांना प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांबाबत सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा असते. परंतु, राजकीय प्रश्न विचारून काहीजण सामान्यांच्या प्रश्नाला बगल देतात. याची आता चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी चांगलेच फटकारले. हा सातारा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे. अशी अपेक्षा उपस्थित असलेल्या काही भाजप नेत्यांनी बोलून दाखवली. जानकर व अभ्यासू पत्रकारांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागतात. अधिकारी व मंत्र्यांना जाब विचारला जातो. लोकशाहीची लक्षणे आहेत. प्रसारमाध्यमही त्यांना चांगली प्रसिद्धी देतात. परंतु काही प्रश्न उपस्थित केले तर त्याची कुठेही प्रसार माध्यमात नोंद होत नाही. परंतु इतर प्रश्न विचारणे अवघड जाते व वेळ वाया जातो. याकडे अनेकांनी लक्ष वेधले.
मंत्री गोरे यांनी विषयांतर करून विचारलेल्या प्रश्नाबाबत फिटकारले
RELATED ARTICLES