प्रतिनिधी : वारकरी संप्रदायाचे महान संत कृष्णदास महाराज यांच्या ३१व्या समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक २८ ते ३० जुलै २०२५ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा होणार आहे. श्रावण शुद्ध चतुर्थीपासून नागपंचमीपर्यंत ३ दिवस संतांच्या चरणी हरिनामाचा निनाद होणार आहे.
सोहळ्याची सुरुवात सोमवार २८ रोजी सकाळी महापूजा, घटस्थापना, विणापूजन, दीपप्रज्वलन आणि ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर संत अमरगाथा पारायण, दिंडी-पालखी, रात्री किर्तन व जागर होणार आहे.
२९ जुलै रोजी समाधीवेळेनिमित्त विशेष प्रवचन ह.भ.प. पांडुरंग महाराज चौगुले (मुंबई) व डॉ. ज्ञानेश्वर महाराज थोरात यांचे होणार आहे. तसेच महिलांचा आनंदीविष्कार, कीर्तन आणि रात्र जागर रंगणार आहे.
३० जुलै रोजी काल्याचे कीर्तन ह.भ.प. नामदेव महाराज ढवळे यांच्या द्वारा होईल. यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.
हा पावन सोहळा तळेकरवाडी, इंगवलेवाडी, सालगाव पंचक्रोशी व संत कृष्णदास सेवा समिती ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने संपन्न होणार आहे.
राम कृष्ण हरि!
सर्व भाविकांनी उपस्थित राहून भक्तिभावात सहभागी व्हावे, ही विनंती.