गणेशभक्तांचा विजय : एस.टी. महामंडळाची ३०% भाडेवाढ मागे
मुंबई : गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाच्या निषेधामुळे एस.टी. महामंडळाने गट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर लादलेली ३०% अतिरिक्त भाडेवाढ एका दिवसात मागे घेतली.
२२ जुलैपासून ही वाढ लागू करण्यात आली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक भाडेवाढ लागू केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या निर्णयाविरोधात संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची चेतावणी देण्यात आली. तत्काळ प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी ही वाढ रद्द करण्याचे आदेश दिले.
या लढ्यात भास्कर चव्हाण (सरचिटणीस), अनिल आगरे (उपाध्यक्ष), रणजित वरवटकार (संघटन मंत्री), गणेश फिलसे (कोषाध्यक्ष), चंद्रकांत बुदर (कार्यवाह), संतोष पाटील, संजय पवार, नितीन वायकर, सुनील मोहिते, बाळा बोरकर, प्रदीप तांडेल, संतोष गुरव, रमेश भाटले, धनाजी म्हाप, संतोष आंबवले, अजय मोहिते यांनी मोलाचे योगदान दिले.
भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशीही शिष्टमंडळाने चर्चा केली. प्रवाशांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.