Saturday, July 26, 2025
घरमहाराष्ट्रकारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर) : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यतर्फे कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २६ जुलै, २०२५ रोजी शहीद स्मारक,बीएमसी ऑफिस समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे करण्यात आले आहे.
सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कारगिल युध्दाचे २६ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल (विजयोत्सव) सोहळा साजरा करण्याचे नियोजित केले आहे.या कार्यक्रमाचे स्वरूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सकाळी ८.०० वाजता : देशभक्ती गीतांची धून,सकाळी ९.३० मि.: प्रमुख पाहुण्यांचे आगमन,सकाळी १०.०० वाजता : कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना, सकाळी ११.०० वाजता : विविध सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन कवायती चे प्रदर्शन,सकाळी ११.३० वाजता : प्रमुख मान्यवरांचे संबोधन, दुपारी १२.०० वाजता :कारगिल युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा व वीरनारी, वीर पिता, वीरमाता यांचा सत्कार सोहळा पार पडणार असल्याची माहिती डी.एफ. निंबाळकर( जनरल सेक्रेटरी -सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य)यांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments