मुंबई (शांताराम गुडेकर) : गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा सर्वांत भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे.दरवर्षी लाखो कोकणवासी मायभूमीकडे – कोकणात – गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सण साजरा करण्यासाठी प्रवास करतात.मात्र,मुंबई-गोवा महामार्गाचे दीर्घकाळ चालू असलेले आणि अद्याप अपूर्ण असलेले काम हे Background मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरले आहे.
यंदाही,महामार्गाच्या कामातील दिरंगाईमुळे हजारो प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागणार आहे. वेळेवर पोहोचता येत नाही, अपघातांचे प्रमाण वाढते आहे, तसेच सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीवरही गंभीर परिणाम होत आहेत.हे दुर्लक्ष कोकणवासीयांच्या आणि गणेशभक्तांच्या श्रद्धेवरच घाला घालणारे आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ मार्फत कोकणकरांची महासभा आयोजित केली आहे.यामध्ये मुंबई व ठाण्यातील कोकण वाशीयांच्या सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था तसेच विकास मंडळे ,एस.टी. प्रवासी संघटना, कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनासह खाजगी वाहतुकदार तसेच ट्रान्सपोर्ट यांच्यासंघटना, तसेच राजकिय पक्षांचे मान्यवर, समाजसेवक, सर्व सामान्य कोकणकर उपस्थित राहणार आहेत. ही सभा सुरेन्द्र गावस्कर सभागृह मराठी ग्रथसंग्रहालय,नायगाव , दादर पुर्व मुंबई येथे रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित केली आहे.
यावेळी कोकणकरांचा कौल घेत सरकार ला अल्टिमेटम व मान्यवरांचे मार्गदर्शन घेत पुढील मागण्या अडचणीकडे लक्ष वेधण्यात येईल
मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी विशेष नियोजन करावे,कोकण रेल्वे व एसटी प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ उपाययोजना व रस्त्यांची दुरुस्ती करावी यावर चर्चा आणि सरकार कडे मागण्या करण्यात येणार आहेत.
सरकारकडे एकच मागणी करतो की,कोकणवासीयांचा संयम अजून किती वेळ पाहणार?तरी सर्व संघटनांना, कार्यकर्त्यांना, कोकणप्रेमींना आणि सामान्य प्रवाशांना विनंती करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारवर दबाव आणण्यासाठी, आणि प्रशासनास जाब विचारण्यासाठी एकत्र येऊया.आपल्या हक्कासाठी…आपल्या रस्त्यांसाठी…आपल्या गणेशोत्सवासाठी…आवाज उठवायलाच हवा.तरी या सभेला कोकणवाशीय मुंबई कर यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असं आवाहन मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे रविवारी दादर येथे कोकणकरांची महासभा
RELATED ARTICLES