
प्रतिनिधी : ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक,अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे भाजपा शिवसेना महायुतीच्या दक्षिण मुंबईचे लोकसभेचे उमेदवार, आमदार यांमिनी जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांच्यासोबत ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश गोरघाटे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.