पाचगणी भिलार : दापवडी (तालुका जावळी ) येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाची कू. आकांक्षा प्रकाश गोळे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत २१८ गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. याबद्दल आकांक्षाचा विविध मान्यवरांनी सत्कार केला.
दापवडी (ता.जावळी ) येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील कु. गोळे आकांक्षा प्रकाश, गोळे विघ्नेश गणेश ,कु.पोरे तन्वी विक्रम आणि बेलोशे सार्थक शिवाजी या चार विद्यार्थ्यांनी आठवी शिष्यवृत्तीत घवघवीत यश संपादन केले. येतील आकांक्षा गोळे हिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले याबद्दल आकांक्षा गोळे हिचा नुकताच माजी केंद्रप्रमुख शंकर बिरामणे, दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, अश्वटेक कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक नितीन गावडे यांनी सत्कार केला.
यावेळी दापवडी गावचे सरपंच महादेव रांजणे, सदाशिव रांजणे ,मुख्याध्यापक पुंडलिक कांबळे , आर. एस. बुरूंगले , नितीन घाडगे , प्रतिभा जंगम , श्री. कुंभार सर यावेळी उपस्थित होते.
आकांक्षा गोळे हिने शिष्यवृत्तीत यश मिळवून स्वतःबरोबरच शाळेचेही नाव उंचावले आहे. तिचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा तसेच शिक्षा वर्गानेही अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती सारख्या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी माजी केंद्रप्रमुख शंकर बिरामणे यांनी केले.
दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना भौतिक तसेच शालेय सुविधाही मुबलक उपलब्ध आहेत. शिक्षकही मेहनत घेत आहेत. या सर्वाचा पुरेपूर लाभ उठवत अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे. आणि आपले भवितव्य निश्चित करावे असे यावेळी रविकांत बेलोशे यांनी सांगितले.
आकांक्षा गोळे हिने गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले बद्दल तिचे कोयना एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री किसनराव जाधव, सचिव डी. के. जाधव, संचालक बी. व्हि. शेलार, धोंडीराम जंगम आदीनी अभिनंदन केले आहे.
दापवडी: आकांक्षा गोळे हिचा सत्कार करताना रविकांत बेलोशे शेजारी महादेव रांजणे, सदाशिव रांजणे व इतर