पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदवीधर संघाच्या संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन आज पुण्यात करण्यात आले. या बैठकीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार मा. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सर्व फ्रंटल व सेल विभागाचे प्रभारी आमदार मा. रोहित पवार, प्रदेश सरचिटणीस श्री. रविंद्र पवार, प्रदेश उपाध्यक्ष भूषणसिंह राजे होळकर, पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, तसेच प्रमुख पदाधिकारी, विविध जिल्ह्यांचे पदवीधर संघ जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान संघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला. पदवीधर युवकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यांच्या
हक्कासाठी संघर्ष करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. तसेच आगामी मराठवाडा व पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबवण्याचा निर्धार करण्यात आला.
पक्षाच्या संघटनेचा विस्तार आणि पदवीधर वर्गाशी थेट संवाद प्रस्थापित करण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले.