कराड(विजया माने) : रोटरी क्लब मलकापूरची स्थापना 25 मे 2016 रोजी झाली.सर्व नवीन कार्यकारणीचा दहावा पदग्रहण सोहळा शताब्दी हॉल कराड येथे उत्साहात साजरा झाला
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री निकुंज व्होरा डायरेक्टर मॅप्रो उद्योग समूह पाचगणी तसेच असिस्टंट गव्हर्नर श्री जगदीश वाघ यांच्या उपस्थितीत मावळते अध्यक्ष रो चंद्रशेखर दोडमणी यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे रो राहुल जामदार यांच्याकडे सुपूर्त केली. तर सचिव पदाची सूत्रे विकास थोरात यांनी रो विजय दुर्गावळे यांच्याकडे दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद आमले ,शुभांगी शेलार सरोज सोनवले अंजली जामदार यांनी केले.
तसेच यावर्षी तरुण पिढीसाठी त्यांचा रोटरॅक्ट क्लब नवीन स्थापन करण्यात आला
नूतन रोटरॅक्टअध्यक्ष म्हणून अभिषेक मुळीक व सचिव सायली यादव हिची निवड करण्यात आली
कार्यक्रम प्रसंगी नूतन अध्यक्ष राहुल जामदार यांनी येणाऱ्या काळामध्ये होणारे नवीन प्रोजेक्ट, रोटरी ची दिशा यासंबंधी माहिती दिली . तसेच प्रमुख पाहुणे निकुज व्होरा यांची मुलाखत रो विजय चव्हाण यांनी घेतली या मुलाखतीत मॅप्रो ची यशोगाथा तसेच सातारा मधील ब्रँड साता समुद्र पार कसा पोहोचला या संदर्भात श्रोत्यांना माहिती मिळाली
याप्रसंगी श्रीमती मंगला आवळे 71 व्या वर्षीही रिक्षा चालवतात त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट क्लब मलकापूरचे सर्व सदस्य व संचालक उपस्थित होते शेवटी रो विजय दुर्गवळे यांनी आभार मानले
रोटरी क्लब मलकापूरचे पदग्रहण उत्साहात
RELATED ARTICLES