
प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निरूपम यांनी पत्नी आणि मुलीसह शिवसेनेत प्रवेश केला. संजय निरुपम काही काळापासून काँग्रेस पक्षात नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी उघडपणे बोलूनही दाखवली होती. खासकरून महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटानं मुंबईमध्ये अधिक जागा घेतल्यानंतर निरुपम आक्रमक झाले होते. यादरम्यानच त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेचा भगवा हाती घेतला.