Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रभाजप कार्यालयात ठेक्यासाठी समर्थकांमध्ये ठोकाठोकी....

भाजप कार्यालयात ठेक्यासाठी समर्थकांमध्ये ठोकाठोकी….

कुडाळ(अजित जगताप) : सबका साथ सबका विकास.. हे ब्रीदवाक्य असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा जावळी तालुक्यातील कुडाळ येथील पक्ष कार्यालयात उद्घाघाटनानंतर झालेल्या पहिल्या बैठकीत एका ठेक्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे कट्टर समर्थक दोन गटात ठोकाठोकी झाली. या प्रकारामुळे भाजपचा आणखीन एक दडलेला चेहरा समोर आला आहे.
जावळी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण व बाजारपेठ असलेल्या कुडाळ येथे गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे दिमाखात उद्घाघाटन झाले. या कार्यक्रमाला ठेकेदारांनी यथोचित सहभाग घेतला. परंतु, काही विकास कामाची निविदा काढताना कुडाळ ग्रामपंचायत कडून नेत्याच्या आदेशाने संबंधित प्रस्तावाची कागदपत्रे देण्यात आली नाही.हा कळीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अल्पसंख्याक समाजाच्या दफन भूमीच्या कामांसाठी पाठपुरावा करण्यात आला. सदर कामाला सव्वा कोटी रुपयांपर्यंतचा निधी मंजूर झाला. आता प्रशासकीय मान्यतेसाठी व निविदा प्रक्रिया साठी संबंधित कामाची कागदपत्रे सादर करणे कुडाळ ग्रामपंचायतला क्रमप्राप्त आहे. परंतु काही कागदपत्राची मागणी करूनही दिली जात नाहीत असा आरोप होत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे जावळी तालुक्यात विकास कामे करून दाखवतात. परंतु, काही सराईत ठेकेदारच यावर ताव मारतात. पण कोणीही याबाबत आवाज उठवत नाही. अखेर ठेकेदारांनीच एकमेकांच्या विरोधात आपल्याला कामे मिळावी. म्हणून कुडाळ बाजारपेठेतील भाजप पक्ष कार्यालयातच एकमेकांच्या विरोधात ठोकाठोकी केली आहे.
कुडाळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये ९ मे २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंत्री महोदयांनी नागरी सुविधांच्या कामाची शिफारस केली होती. यामध्ये साई चौक ते ब्राह्मण शाही रस्ता कॉंक्रिटीकरण ठाकर घर ते साईबाबा मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण जोशी वाडा परिसरात बंदिस्त गटार पालवे डॉक्टर शेजारी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण मनेर गुरुजी घरासमोर रस्ता डांबरीकरण राजू पांडू पवार ते बंडूलाखे घरापर्यंत गटर बांधकाम आणि फुलचंद दगडू पवार ते शांताराम यादव घरासमोरील गटार बांधकाम अशी विकास कामे सुचवली होती. नागरी सुविधांबाबत कामांना मंजुरी मिळून निधी उपलब्ध करावा असे पत्रही देण्यात आले होते. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाच्या दफनभूमी बाबतही कामाची मंजुरी मिळवून पेक्षा निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र हवी होती.
कुडाळ ग्रामपंचायत मध्ये दोन गट असल्यामुळे मंत्र्यांच्या विकास कामांना श्रेयवादाची ही लागण झालेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच रंगीत तालीम पाहण्यास मिळाली आहे.
कुडाळ ग्रामपंचायतने चार वर्षांमध्ये मागासवर्गीयांचे १५ टक्के अनुदान सुद्धा दिलेले नाही. पंधराव्या वित्त आयोगाचे विकास कामांबाबत चार ढकल होत आहे. असा गंभीर आरोप काहींनी केला आहे. निधी माघारी गेल्यास त्याला जबाबदार कोण राहील? असाही प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र नाव सांगण्यास टाळले आहे.
शनिवारी झालेल्या या प्रकाराने कुडाळ परिसरात नव्हे तर संपूर्ण जावली तालुक्यात भाजप पक्षाच्या प्रतिमेला चांगलाच तडा गेला आहे. सर्व पक्षाचा अनुभव असलेल्या नेत्यांना ही भांडण सोडवताना अनेक आश्वासने द्यावी लागली. मुळातच भाजप पक्ष ठेकेदार चालवत असल्यामुळे असा प्रकार घडल्याची टीका या निमित्त विरोधकांनी सुरू केले आहे. दरम्यान, याबाबत भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

_____________________
फोटो कुडाळ ग्रामपंचायत तालुका जावळी जिल्हा सातारा

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments