सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पष्टवक्तेपणा व रोखठोक विधायक कामाची पद्धत असणारे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुक्यात व सातारा येथील राष्ट्रवादी भवन मध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. सातारा , कोरेगाव, फलटण,वाई व जावळी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
सातारा जिल्ह्यामध्ये २६ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुहूर्तमेढ रोवली होती. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्या घड्याळाची टिकटिक वाई, खंडाळा, महाबळेश्वर व फलटण- कोरेगावात आजही कायम आहे. संपूर्ण सातारा जिल्हा माहित असलेले ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यानंतर अजित दादा पवार हे नेते आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त व औद्योगिक वसाहत व इतर कामगार यांना न्याय मिळाला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला योग्य भाव मिळावा. यासाठी ही त्यांनी विशेष प्रयत्न केले. आजही विविध पक्षाचे नेते विकास कामांसाठी त्यांच्या संपर्कात आहेत.
सत्ता ही सर्वसामान्य माणसांच्या परिवर्तनाची नांदी आहे. सत्ता असो किंवा नसो. आदरणीय अजित दादा पवार या नावाचा दबदबा आजही कायम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या देवगिरी बंगल्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यातून कार्यकर्त्यांची गर्दी होते. प्रत्येकाला नाष्टा व चहापान देऊनच नेते अजितदादा पवार माणुसकीचे दर्शन घडवतात. सामान्य माणसांसाठी थेट मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश व सूचना करणारे नेते लक्षवेधी ठरले आहेत.
सातारा जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा निवडणुकीत यशस्वी होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज सकाळी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुनर्वसन व मदत मंत्री नामदार मकरंद पाटील, फलटणचे आ. सचिन कांबळे- पाटील ,जावळी तालुक्यात व सातारा येथील जिल्हा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अँड उदयसिंह पाटील उंडाळकर, श्रीनिवास शिंदे, मनोज देशमुख, सीमाताई जाधव, प्रकाश येवले, महादेव लोहार ,बबनराव निकम, संतोष ननावरे, स्मिता देशमुख, संदीप चव्हाण, भाऊ शिर्के, लक्ष्मी कळंबे, संतोष ननावरे, शिवाजी चिकणे, बाळासाहेब शेलार, महादेव रांजणे, प्रदीप कदम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबिर, फळ वाटप कार्यक्रम , आरोग्य शिबिर आणि विविध कलागुणांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आले होत्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर आमचे नेते अजितदादा पवार हे एक दिवस विराजमान नक्कीच होतील. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवून देतील असा सार्थ विश्वास राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी व्यक्त केला आहे. वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध उपक्रम राबवल्यामुळे सबकुछ अजित दादा असे चित्र पाण्यास मिळाले.
________________________________________
फोटो – राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेले कार्यक्रम (छाया– अजित जगताप सातारा)