Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रबळीराज सेनेच्या वतीने दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद, ११...

बळीराज सेनेच्या वतीने दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद, ११ पंचायत समिती व सात नगरपंचायतीच्या जागा लढविणार..!

मुंबई (शांताराम गुडेकर) : बळीराज सेनेच्या वतीने दक्षिण रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद, ११ पंचायत समिती व सात नगरपंचायतीच्या जागा लढ़विणार असे मुंबई मध्ये झालेल्या एका महत्वपूर्ण सभेत जाहीर करण्यात आले.बळीराज सेना पक्षाध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या उपस्थितीत मुंबईतील मूलुंड पूर्व येथिल प्रधान कार्यालयात संगमेश्वर तालुक़ा पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीमधे पक्षाध्यक्ष अशोकदादा वालम यांच्या निर्देश्यानुसार दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित ४ तालुक्यातिल सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती जागा लढ़वीण्याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते – माज़ी जिल्हापरिषद विरोधीपक्ष नेते तथा उपाध्यक्ष सन्मा:- सुरेश भायज़े यांच्या नेतृत्वाख़ाली लवकरच जिल्हा पाहणी दौरा आयोजित करुण अहवाल सादर करण्याचे सूचविण्यात आले.सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य संपर्क नेते डॉ:- प्रा:- प्रकाश भांगरथ, सरचिटणीस – संभाजी काजरेकर, जिल्हा अध्यक्ष- तानाजी कुलये, उपाध्यक्ष – दत्ताराम लांबे, चिपळूण- संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख -: प्रभाकर धनावडे, संगमेश्वर तालुक़ा संपर्क प्रमुख श्री:- संजय गोंधळी, सहसंपर्क प्रमुख संतोष टक्के, संघ कार्यकारिणी सदस्य सुरेश कानाल, युवा पदाधिकारी तन्मय टक्के, नविमुंबई तालुक़ा अध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेंद्र जोशी , खापरे, सनगरे, आणि सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments