सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये वाढती गुंडगिरी थोपवण्याचे कामगिरी करावी लागणार आहे. दुपारी एका शालेय विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून एकतर्फी प्रेमाने आंधळे झालेल्या युवकाला अखेर गनिमी काव्याने पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बाबत माहिती अशी की, सातारा शहरात शिक्षण घेणाऱ्या शिक्षण संस्थेमध्ये सदरची अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. त्याच वेळी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या एका बारावीत शिकणाऱ्या आर्यन वाघमळे नावाच्या माथेफिरूनी एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने हातात चाकू घेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. या वेळेला परिसरात मोठी गर्दी जमली. सदर मुलाला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला व नागरिकांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचवेळी त्याची नजर चुकून त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेण्यास यश आले .
त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीची सुटका करून त्या युवकाला संतप्त जमवणे बेदम चोप दिला . सदर विद्यार्थिनी ज्या शाळेत शिक्षण घेत आहे. त्या शाळेतील काही शिक्षकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, त्याची गंभीर दखल न घेतल्यामुळे चाकू घेऊन एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद देण्याची घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू झालेली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांना जागृत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जर पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसेल तर सातारा शहर पोलीस ठाण्यातील संबंधितावर कारवाई केली जाईल. असे आश्वासन दिले आहे. अनेक तक्रारीची दखल न घेताच साताऱ्यात प्रकरण मिटवण्यामध्ये वाढता कल पाहता अशा घटना भविष्यात घडू नये याची आता चिंता शांतता प्रिय नागरिकांना लागलेली आहे.या आयर्न वाघमळेला पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती ही सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिली आहे.
_____________________________
फोटो– अल्पवयीन विद्यार्थिनीला चाकू चा भाग दाखवताना आरोपी