कुडाळ(अजित जगताप)
: प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या लालपरी म्हणजेच एसटी महामंडळाने अनेकांना चांगली सेवा दिलेली आहे. परंतु काही वेळेला सुट्ट्या पैशामुळे वाद विवाद होतात. अशावेळी तिकिटाच्या पाठीमागे उर्वरित पैसे लिहून दिले जाते. परंतु मेढा एसटी आगारातून पैसे परताव्यासाठी वृद्ध प्रवाशाची
अयशस्वी धडपड सुरू झाल्याचे पाण्यात मिळत आहे.
याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जावळी तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच आंदोलनाचाही इशारा दिलेला आहे. याबाबत माहिती अशी की,
मेढा एस टी आगाराचे बस मधून सकाळी नऊ वाजता आलेल्या बसमधून एका वाहकाकडे रानगेघर ते सोमर्डी एसटी प्रवासाच्या तिकीट काढण्यासाठी पाचशे रुपयाची नोट दिली होती. प्रवास करताना सुट्टे पैसे असणे आवश्यक असतात. परंतु त्या वयोवृद्ध दोन प्रवाशांनी सुट्टे पैसे सोबत घेणे विसरले होते. या गोष्टींमध्ये मुळे वाहक व प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर चारशे रुपये परत देऊन एसटी बसचे रिचर्ड तिकीट सुद्धा दिली आणि ६८ रुपये मेढा आगारातून घेऊन जाण्याची सूचना केली. त्या पद्धतीने तिकिटावर लिहून दिले. व ती बस पुढील प्रवासासाठी निघून गेली.
त्यानंतर वयोवृद्ध प्रवाशांनी कुडाळ येथील एस.टी.च्या बस स्थानक असे संपर्क साधला व तक्रार अर्ज दिला. तसेच मेढा एस टी आगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. अशी माहिती एकनाथ रोकडे यांनी दिली. यानंतर मेढा एसटी आगारात संबंधित वाहकाने उर्वरित ६८ रुपये जमा न केल्याचे उघड झाले. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री रोकडे यांनी लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे. सदर प्रवासी विजय गंगावणे यांनीही गाऱ्हाणी मांडली. दरम्यान याबाबत संबंधित वाहक असे संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही. सदरचा प्रकार सुट्ट्या पैशाच्या टंचाईमुळे झाल्याची
चर्चा आहे.
_____________________________
सदर वाहकामुळे व्रद्ध दापत्यांनां आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करायला लागला असून 68 रुपये मेढा डेपोतून आणण्यासाठी पुन्हा 150 रुपये गाडीला खर्च करूनही 68 रुपये मिळाले नाहीत त्यामुळे सामान्य लोकांचे सुट्टे पैसे मागारी न देणाऱ्या वाहकावर योग्य ती कार्यवाही व्हावी व व्रद्ध दापंत्याला न्याय द्यावा अशी मागणी रिपाईचे जावली तालूका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी केली असून कार्यवाही चे निवेदन एस टी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक साहेब यांना पाठवले असून मुजोर एस टी वाहकावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही झाली नाही तर रिपाई मेढा डेपो समोर आंदोलन करणार असा इशारा रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे व विजय गंगावणे यांनी दिला आहे.
_______________₹_____________
फोटो एस.टी. तिकीट व लेखी स्वरूपातील माहिती