मुंबई (शांताराम गुडेकर) : श्री कांडकरी विकास मंडळ, कासार कोळवण ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी आयोजित इयत्ता दहावी, बारावी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक २० जुलै २०२५ रोजी पर्ल सेंटर, दादर (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.श्री कांडकरी विकास मंडळाचे अध्यक्ष मान.श्री संतोष करंबेळे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. श्री.अक्षय दत्ताराम तोरस्कर यांनी बनविलेला श्री विकास मंडळाचा नवीन बॅनर विशेष लक्ष वेधून घेत होता.
या विद्यार्थी गुणगौरव सोहळयाचे सुत्रसंचालन श्री.अक्षय दत्ताराम तोरस्कर आणि श्री. प्रकाश अनंत करंबेळे या मंडळाच्या तरुण तडफदार पदाधिकाऱ्यांनी उत्तमरित्या सांभाळले तर या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिलीप तोरस्कर सर यांनी केले. आधुनिक काळातील शिक्षण आणि आजच्या विद्यार्थ्यांचे करिअर यावर सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.श्री कांडकरी विकास मंडळाचे विद्यमान सचिव आणि वक्ते श्री.राजाराम रावणंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनेक सुंदर गोष्टींचा खजिना विद्यार्थ्यांसमोर सादर केला. त्यांनी संगतीचा शिक्षणावर कसा परिणाम होतो हे अनेक उदाहरणांसह समजावले. मंडळाचे प्रमुख हिशोब तपासणीस आणि उत्कृष्ट निवेदक श्री निलेश धावडे यांनी कवितेतून मांडलेले विचार उपस्थित विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. तसेच मंडळाचे खजिनदार आणि प्रसिध्दीप्रमुख श्री. दिलीप गणपत तोरस्कर यांनी आपले मौलिक विचार मांडत असताना अंकांच्या आधारे एकीचे बळ उत्तमपणे समजावून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मान.श्री संतोष करंबेळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आपले मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना करिअर संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ कटिबद्ध आहे याची ग्वाही दिली.या गुणगौरव कार्यक्रमात कु.भुमी सुनील करंबेळे, कु. प्राची प्रविण धावडे, कु. अक्षरा दिपक करंबेळे,कु. सेजल सतीश करंबेळे, कु. तन्वी अनंत करंबेळे, कु. यश अशोक तोरस्कर, कु.अनिकेत अनिल धावडे, कु.संकेत संतोष धावडे (सर्व दहावी उत्तीर्ण) आणि कु. नौरंग सचिन करंबेळे, कु. प्रणव संजय करंबेळे, कु. शुभम सुनील दळवी, कु. गौरांग रामचंद्र घाटबाणे, कु. आर्यनी नरेश तोरस्कर, कु. प्रणव अनिल धावडे, कु. जान्हवी प्रकाश सनगले, कु. जय संतोष करंबेळे ( सर्व बारावी उत्तीर्ण) तसेच कु. ओमकार संतोष करंबेळे, कु. सौरभ संजय करंबेळे, कु. हर्षदा किशोर करंबेळे ( सर्व पदवीधर) या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करण्यासाठी या शैक्षणिक कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, मंडळाचे पदाधिकारी, गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने मंडळाचे कार्याध्यक्ष मान. श्री.अशोक तोरस्कर, श्री सीताराम करंबेळे, श्री श्रीधर करंबेळे, श्री. नितीन तोरस्कर, श्री कृष्णा रावणंग, श्री. शशिकांत तोरस्कर, श्री रघुनाथ करंबेळे, श्री. सदानंद धावडे, श्री सुरेश तोरस्कर, श्री किशोर करंबेळे, श्री सुनील करंबेळे, श्री प्रवीण धावडे, श्री निलेश सनगले, श्री सचिन घडशी आणि पालक महिलांसह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.या कार्यक्रमात अनेक पालकांनी आपले मनोगते व्यक्त केली. सर्वश्री सचिन करंबेळे, श्री दिपक करंबेळे, श्री सुनील दळवी यांसह अनेक पालकांनी आपले मौलिक विचार मांडले आणि मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. गुणवंत विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी आपल्या सुंदर भावना व्यक्त करताना मंडळाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात श्री.दिलीप तोरस्कर सर यांनी मंडळाच्या शैक्षणिक आणि इतर सामाजिक कार्यांचा संक्षिप्तपणे उल्लेख करत मंडळाचे महत्त्व विशद केले. तसेच आजचा शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वाडीतील अनेक मान्यवर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार मानले आणि वाडीतील विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कार्यक्रमाची उत्तम सांगता केली.
श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
RELATED ARTICLES