Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रजी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक...

जी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे स्मृति दिवस साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर) : १८ जुलै हा अण्णा भाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे.त्यांच्या कार्याला आणि योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.अण्णा भाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात.जी.के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवली अंतर्गत श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एल. जाधव सर उपप्राचार्य श्री. प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री.शफीक शेख सर यांनी प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केले.तसेच प्राध्यापिका रसिका लोकरे मॅडम यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. अण्णाभाऊ साठे यांच्या ” माझी मैना गावाकडं राहिली ,माझ्या जीवाची होतीय काहीली” या पोवाड्याचे सादरीकरण करून मानवंदना दिली.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
अण्णा भाऊ साठे यांनी समाजातील गरीब, वंचित आणि दलित लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील विषमतेवर आणि अत्याचारावर प्रकाश टाकला.त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला.आजचा दिवस अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्याचा दिवस आहे. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांचा प्रसार करणे, हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
जी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments