सातारा(अजित जगताप) : सातारा न्यायालयाच्या कामकाजासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व अनेक प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी विधिमंडळाच्या सभागृहातील आमदारांच्या हाणामारी बाबत विचारले असता आम्ही आमदार होतो. हे सांगायला लाज वाटते. अशी त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
सातारा जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला. ए आय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त असून आमचा विरोध नाही. राज्य शासनाने ए आय साठी ५०० कोटींची तरतूद केलेली आहे .सध्या सर्वच खाजगी व सहकारी साखर कारखान्याने उसाच्या गाळपचे क्षमता वाढवली आहे. अशा वेळेला नियम धाब्यावर बसवले. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने तीन महिने चालतात पण बारा महिने खर्च करावा लागतो. ए आय तंत्रज्ञानामुळे उसाचे उत्पादन एकरी १३५ टन निघणार आहे. तंत्रज्ञान चांगले आहे .तशाच पद्धतीने वजन काटे तपासणी ऑनलाईन केल्यास पासवर्डच्या आधारे साखर आयुक्त, वजन काटा महानिरीक्षक यांनाही माहिती समजून अनेक तक्रारीची निपटारा होईल. सध्या सॅटॅलाइट द्वारे उसाचे फोटो काढल्यानंतर किती टन ऊस? किती साखर उतारा? मिळेल. याची माहिती मिळणार आहे. सध्या नवीन वीज जोडणी बंद असून सौर ऊर्जा ज्या क्षमतेने वीज पुरवठा हवी आहे तो मिळत नाही. याची त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रातील ४५ लाख शेतकऱ्यांपैकी ३० जून च्या आकडेवारीनुसार २२ लाख शेतकरी थकबाकी असल्याने त्यांना कर्ज मिळणार नाही. शेतीमालाला भाव नाही. खताच्या किमती वाढलेले आहेत. अशा अवस्थेत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत विधिमंडळात आवाज उठवला नाही.
शक्तिपीठ महामार्ग शेतकरी होऊ देणार नाहीत. त्यामुळे बारा जिल्ह्यात सर्वे होऊ दिलेला नाही. सरकारला सुबुद्धी देऊ यासाठी आम्ही पंढरपूरच्या श्री विठुरायाला साकडे घातले आहे. शेतकरी परिषदेतून ऊसाला दर दिला जातो पण ऊसतोड आली की शेतकरी साखर कारखान्याला ऊस घालतात. आणि मग त्यांना कमी दर मिळतो. असे त्यांनी सांगितले.
या वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार ,राजू शेळके, साळुंखे व मान्यवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
__________________________
फोटो — स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भूमिका सांगताना राजू शेट्टी व मान्यवर (छाया– निनाद जगताप, सातारा)