कराड(विजया माने) : मलकापूर (ता.कराड) येथे असलेल्या डी-मार्ट मधिल बिलींग व्यवस्था मराठीत करण्यात यावी तसेच येथील कर्मचाऱ्यांच्या नेम प्लेट मराठीत करण्यात याव्यात मलकापूरसह राज्यातील सर्व डी-मार्ट मध्ये येत्या पंधरा दिवसांत हि कार्यवाही करावी अन्यथा मनसे स्टाईलने खळ खटयाक आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
याबाबत डी-मार्टचे स्टोअर मॅनेंजर नागेश नागरेड्डी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाप्रमुख अॅड. विकास पवार, तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण, शहर प्रमुख सागर बर्गे, नितीन महाडीक, संजय मंडलीक, शंभूराज भिसे, संभाजी चव्हाण, योगेश जाधव, अरूण मदने, संभाजी पवार, संभाजी सकट, आकाश नलवडे व मनसैनिक उपस्थित होते.
यावेळी अॅड. विकास पवार म्हणाले की, कराड व मलकापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामिण भागातून नागरीक माल खरेदीसाठी डी-मार्ट मध्ये येतात. मात्र डी- मार्ट मधिल मालाची खरेदी केल्यानंतर त्यांना इंग्रजीत बिल देण्यात येत आहे. बहुतांष ग्राहकांना इंग्रजी समजत नसल्याने त्यांना आपण खरेदी केलेल्या मालाची माहिती व किंमत कळत नाही. वास्तवीक महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रत्येक व्यवसाईकाने मराठीलाच प्राधान्य दिले पाहिजे. राज्यभर डी-मार्ट ची यंत्रणा आहे त्यामुळे डी-मार्टच्या प्रशासनाने मलकापूर बरोबरच राज्यातील सर्व डी-मार्ट मध्ये मराठी बिलींगची सोय करावी.
तसेच डी-मार्ट मध्ये आलेल्या ग्राहकाला कर्मचाऱ्याबाबत तक्रार असेल तर त्याची नेमप्लेट इंग्रजीत असल्याने तक्रार करताना अडचणी येतात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेटही इंग्रजीत कराव्यात. येत्या पंधरा दिवसांत हि कार्यवाही केली नाह तर मनसे स्टाईलने खळ खटयाक आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.
मनसेच्या दणक्याने नेम प्लेट मराठीत
मराठीच्या मुद्यावर मनसेचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच डी-मार्ट प्रशासनाने तत्काळ कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट मराठीत केल्या आहेत. मनसेच पदाधिकारी निवेदन देण्यासाठी डी-मार्ट पोहचले तेव्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या नेमप्लेट मराठीत असल्याचे पहावयास मिळाले. मनसेच्या वतीने डी-मार्टच्या या कार्यवाहीचे स्वागत करण्यात आले. याप्रमाणेच लवकरात लवकर बिलींग व्यवस्था मराठीत करण्याची मागणी करण्यात आली.
डी-मार्ट मधिल बिलींग मराठीत करा… पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास खळ खटयाक, मनसेचा ईशारा
RELATED ARTICLES