प्रतिनिधी(मंगेश कवडे) : दहावी – बारावीचा निकाल वेळेत लावण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. त्यानुसार 25 मेपर्यंत बारावीचा तर दहावीचा निकाल 6 जूनपूर्वी जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान आतापर्यंत बारावीच्या 99 टक्के तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 85 टक्के उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत.