मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संस्थेचे अधिकारी श्री अशोक दुबे, गंगेश्वर श्रीवास्तव, बी.बी. तिवारी आणि राजा फिरोज खान यांनी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनवर अन्याय करत असल्याचा आरोप करत आज मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. FWICE कडून बेकायदेशीर निवडणुका घेत युनियन तोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही सर्व सदस्यांनी एकत्र येऊन तो हाणून पाडला, असे यावेळी सांगण्यात आले. घटना व कायद्यानुसार एक महिना आधी नोटीस देऊन निवडणूक घेण्यात आली असून सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. FWICE ही संघटना वारंवार विभाजन करून युनियन तोडण्याचा प्रयत्न करते, म्हणून FWICE चे ट्रेड युनियन रजिस्ट्रेशन रद्द करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
यांची संघटनेने बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यशवंत गंगावणे, जाहिद शेख, व प्रकाश सोलिया यांनी काम पाहिले. जाहीर शेख यांनी ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशन कार्यकारणी घोषित केली.