Sunday, August 31, 2025
घरआरोग्यविषयकखवय्यांसाठी दिलासादायक बातमी! समोसा-जलेबीवर तंबाखूसारखी चेतावणी? नाही! – पीआयबी फॅक्ट चेकने...

खवय्यांसाठी दिलासादायक बातमी! समोसा-जलेबीवर तंबाखूसारखी चेतावणी? नाही! – पीआयबी फॅक्ट चेकने केला खुलासा

विशेष प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून समोसा, जलेबी, लाडू यांसारख्या पारंपरिक गोड व तळलेले अन्नपदार्थ आरोग्यास घातक असल्याची चेतावणी असलेली लेबल लवकरच लावली जाणार, असा दावा काही माध्यमांतून करण्यात आला होता. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आणि निराधार असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्ट केले आहे.

या दाव्यानुसार, जसे तंबाखूजन्य उत्पादनांवर आरोग्याच्या धोक्याविषयी चेतावणी दिली जाते, तसेच लेबल आता समोसा, जलेबी यांच्यावरही दिसणार होते. तथापि, आरोग्य मंत्रालयाने असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीआयबीने सांगितले आहे की, आरोग्य मंत्रालयाने केवळ कॅन्टीन किंवा जेवणाच्या ठिकाणी फॅट आणि साखरेचे प्रमाण दाखवणारे फलक लावण्याचा सल्ला दिला आहे. पण, हे बंधनकारक नाहीत.

या उपक्रमामागे वाढता लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि रक्तदाब यांसारख्या आजारांबद्दल जनजागृती करणे हा हेतू असल्याचे म्हटले गेले होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये याचा विपर्यास होऊन, खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या.

सरतेशेवटी, खवय्यांसाठी दिलासदायक गोष्ट म्हणजे समोसा, जलेबी, लाडूवर तंबाखू सारखी चेतावणी येणार नाही! मात्र, संतुलित आणि आरोग्यदायी आहाराची गरज लक्षात घेऊन नागरिकांनी स्वखुशीने योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments