Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसातारा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत सुमारे चारशे परवाने वितरित

सातारा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत सुमारे चारशे परवाने वितरित


सातारा(अजित जगताप): ४५ सातारा लोकसभा मतदार संघात उन्ह व प्रचाराचा चांगलाच जोर वाढलेला आहे. अशा वेळेला एक खिडकी कक्षा द्वारे परवाने देण्यात येत आहेत .त्यानुसार आतापर्यंत सुमारे चारशे परवाने निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्याकडेच जास्त परवाने आहेत.
सातारा लोकसभा मतदार संघासाठी आत्तापर्यंत वाहन परवाना, सभा परवाना, पदयात्रा, रॅली, तात्पुरती प्रचार कार्यालय, कार्यकर्त्यांचा मेळावा, फ्लेक्स, पथनाट्य ,हेलिकॉप्टर उतरवणे, इतर स्वागत मिरवणुकीमध्ये वाहन चालवण्याचा परवाना, ध्वनिषेपक, बॅनर झेंडे व लीड स्क्रीन द्वारे जाहिरात त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम व मैदान उपलब्ध करणे. अशांसाठी परवाने काढणे आवश्यक आहे .सध्या लग्नसराई व यात्रा जत्रा यांची रेलचेल असल्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे सुद्धा उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. यामध्ये व्यवसाय उद्घाघाटन पुण्यतिथी, गावदेव, लग्नाची वरात ,उरूस कुस्ती अनुमती यासारखेही परवाने काढण्यात आलेले आहेत.
आता निवडणुकीला पाच दिवसाचा अवधी उरलेला असून व्यक्तिगत पातळीवर कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपली भूमिका समजावून सांगत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण १८ लाख ८८ हजार६०५ मतदार असून त्यामध्ये शासकीय सेवेत असलेले ९५८५ मतदार हे पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करत आहेत. त्याचप्रमाणे वयोवृद्ध व दिव्यांग यांचेही मतदान झाले आहे. आतापर्यंत राजकीय पक्ष प्रतिनिधी व उमेदवार यांनी लोकशाही व आचारसंहितेचे काटेकोरपणाने पालन करून या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी व्हावे .यासाठी शासकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत.
नवीन मतदारांची संख्या दीड लाख असल्यामुळे तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे व नूडल अधिकारी अभिजीत पाटील व अन्य निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सात मे रोजी सर्व मतदारांनी मतदान करावे. यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी मतदान कमी झालेले आहे. त्याची कारण पाहून त्या ठिकाणी उपाय योजना राबवण्यात आलेले आहेत. एकूणच उन्हाची तीव्रता पाहता सर्व सुख सुविधा उपलब्ध केल्यामुळे किमान ७० ते ७५ टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त मतदान होईल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कार्यकर्ते व नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गावातील प्रत्येक मतदारांनी मतदान केलेच पाहिजे यासाठी प्रयत्न करावा. अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments