मुंबई(सदानंद खोपकर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र विधानभवनात “अग्निशिला” या हिंदी मासिकाच्या 21 व्या वर्धापनदिन विशेषांकाचे उद्घाटन संपन्न झाले.
हे मासिक संपादक अनिल वेदव्यास गलगली यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली गेली दोन दशके सामाजिक प्रश्न, जनहित, माहिती अधिकार व लोकजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.
विशेषांकाच्या माध्यमातून समाजातील अस्वस्थता, प्रश्न व बदलाचे आवाज प्रभावीपणे समोर आणले जात आहेत. “अग्निशिला” ही केवळ मासिक नव्हे, तर एक जिवंत चळवळ ठरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी संपादक अनिल गलगली यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.