मुंबई : ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. शिंदे यांच्या समर्थकांनी या निर्णयानंतर जोरदार जल्लोष केला.
“मी सामान्य कुटुंबातून आलोय. आर.आर. पाटील यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेऊन, शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवेन. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी लढेन,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते असून पक्षात त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्ष संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.