मुंबई – राज्य सरकारने एमएमसी रजिस्ट्रेशन रद्द करणे आणि एफडीएचे परिपत्रक मागे घेणे या निर्णयाविरोधात राज्यातील हजारो होमिओपॅथी डॉक्टर १६ जुलै २०२५ पासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. महाराष्ट्र युनायटेड होमिओपॅथिक डॉक्टर्स फ्रंट या संघटनेने आंदोलनाचे आयोजन केले आहे.२०१४ मध्ये विधिमंडळाच्या मंजुरीने होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथीची परवानगी आणि सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर शेड्युल २८ अंतर्गत एमएमसीमध्ये नोंदणी देण्याचा कायदेशीर निर्णय घेण्यात आला होता. मात्र, १५ जुलै २०२५ पासून ही नोंदणी सुरू होण्याआधीच सरकारने अचानक निर्णय मागे घेतला, ज्यामुळे एक लाखांहून अधिक डॉक्टरांवर अन्याय झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.संघटनेचे नेते डॉ. जे. बाहुबली गहा यांनी सर्व लोकप्रतिनिधींना १६ ते १८ जुलै दरम्यान आंदोलनस्थळी भेट देण्याचे आवाहन केले असून, विधिमंडळात आवाज उठवून रद्द केलेली नोंदणी व परिपत्रक पुन्हा लागू करण्याची मागणी केली आहे.यावेळी डॉ. संतोष अवचार डॉ. जयंत रांजणे, डॉ. निलेश जाधव,शिवदास भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानात आमरण उपोषणाचा इशारा
RELATED ARTICLES