कराड(प्रताप भणगे) : कराड-चांदोली रोडवरील पाचवड फाटा येथे वळण घेताना रस्त्यातील खोल खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रचंड नुकसान होत होते. दुचाकीस्वारांपासून ते चारचाकी वाहनांपर्यंत अनेकांना या अपूर्ण रस्त्याचा फटका बसत होता. अपघातांची मालिका सुरूच होती.या गंभीर समस्येबाबत DDM न्यूजकडे स्थानिक रहिवाशांकडून तक्रार आली. प्रतिनिधी प्रताप भणगे यांनी घटनास्थळाचे फोटो आणि सविस्तर माहिती पाठवून प्रशासकीय यंत्रणांचे लक्ष वेधले. “रस्त्यात खड्डा नव्हे, तर खड्ड्यात रस्ता आहे” अशीच अवस्था त्या ठिकाणी दिसून येत होती.DDM न्यूजने या समस्येचा घेतलेला तत्काळ पाठपुरावा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी केलेली थेट चर्चा यामुळे प्रशासन हलले. अवघ्या पाच तासांत रस्त्याचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे खड्डे बुजवण्यात आले.या तत्पर कारवाईबद्दल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी DDM न्यूजचे आभार मानले आहेत.
DDM न्यूज इम्पॅक्ट: केवळ पाच तासांत खड्ड्यांनी भरलेला रस्ता झाला सुरळीत!
RELATED ARTICLES