Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भफॉरेन्सिक सुविधांच्या आधुनिकीकरणामुळे न्याय प्रक्रियेत वेग आणि पारदर्शकता!

फॉरेन्सिक सुविधांच्या आधुनिकीकरणामुळे न्याय प्रक्रियेत वेग आणि पारदर्शकता!

प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘प्रादेशिक न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळा’, नागपूर – नूतन इमारती’चे भूमिपूजन संपन्न झाले.

फौजदारी न्याय न्यायव्यस्थेत फॉरेन्सिक लॅबचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण जे 3 नवीन फौजदारी कायदे तयार केले (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा) या सर्व कायद्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावा महत्त्वाचा आहे. गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी फॉरेन्सिक पुरावा महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्याचा गुन्हा सिद्धतेचा दर 54% आहे. विकसित अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करत असून, गुन्हा सिद्धतेचा दर 90% पर्यंत न्यायचा आहे. यामध्ये फॉरेन्सिक पुरावा खूप महत्त्वाचा असणार आहे. गुन्हेगार अधिक स्मार्ट होत चालले असतील, तर त्यांना रोखण्यासाठी आपल्यालाही अधिक हुशारीने आणि आधुनिकतेने त्यांचा सामना करावा लागेल. यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील आणि योग्य प्रशिक्षणही द्यावे लागेल.

देशातील सर्वात आधुनिक सायबर फॉरेन्सिक व्यवस्था व सायबर लॅब आपण महाराष्ट्रामध्ये तयार केली आहे. अनेक राज्यातील व देशातील लोक अशा प्रकारची लॅब बनवून देण्याची विनंती करत आहेत. गुन्हेगाराच्या दोन पावलं पुढे राहीलं तरच गुन्ह्यांवर आपण आळा घालू शकतो. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या कामांमध्ये लोकाभिमुखता आणण्याच्या दृष्टीने ही सर्व व्यवस्था आपण उभी केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

वेळेत न्यायदान होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक लॅबचा मोठा लाभ होणार आहे. ह्या लॅब घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा करण्यात मदत करतात, ज्यामुळे तपास प्रक्रियेला वेग येतो. फॉरेन्सिक विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये विभागाची कार्यक्षमता तब्बल 22 % वाढली आहे. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी रोज चार तास जास्त काम करण्याचा व शनिवारी देखील काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र स्तरावर कार्यान्वित सेंटर ऑफ एक्सलन्स (पुणे), सेमी ॲटोमेटेड सिस्टीम (मुंबई) व राज्यातील प्रयोगशाळा संगणकीकरणाचा दुसरा टप्पा या प्रकल्पांचे लोकार्पण केले.

यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. संदीप जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments