Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले पवित्र संविधान बदलण्याची भाजपा सरकारचा डाव –...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले पवित्र संविधान बदलण्याची भाजपा सरकारचा डाव – खा. वर्षा गायकवाड

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार मतांची चोरी करून स्थापन झालेले आहे. विधानसभा प्रचारावेळी राज्यात भाजपा कुठेच दिसली नाही पण मतचोरी करुन सरकार आणले आहे. राहुल गांधी यांनी या मतचोरीचा जाब निवडणूक आयोगाला विचारला पण अद्याप आयोगाने उत्तर दिले नाही. विधानसभेची निवडणूक पराभूत झालो याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सोडलेला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी म्हटले आहे.

मुंबई काँग्रेस आयोजित संविधान जिंदाबाद जनसभेत
इम्रान प्रतापगढी बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षाताई गायकवाड, आमदार अस्लम शेख, अमिन पटेल, मा. आ. मधु चव्हाण, भवरसिंह राजपुरोहित, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, नगरसेवक हाजी बब्बू, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, निजामुद्दीन राईन, मंदार पवार, तारक शहा, जावेद जुनेजा, अवनीश सिंग, यांच्यासह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेला संबोधित करताना इम्रान प्रतापगढी पुढे म्हणाले की, मुंबईत सध्या भाषा वाद सुरु आहे पण या शहराने देशाच्या कोणत्याही भागातून आलेल्या लोकाला सामावून घेतले आहे, त्यांना आश्रय दिला दिला, रोजीरोटी दिली व त्यांचे स्वप्न साकारले आहे. या शहराने कधीच भाषा, प्रांत, जातधर्म विचारला नाही. भाषेचा सन्मान झाला पाहिजे यात दुमत नाही. महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे. या भूमितून काही लोक गंगा जमनी संस्कृती नष्ट करू पहात आहेत ही संस्कृती वाचवण्यासाठी पुढे या असे आवाहन त्यांनी केले.
प्रतापगढी पुढे म्हणाले की, देशात सरकार भाजपाचे आहे पण संसदेत आवाज राहुल गांधी यांचाच चालतो. भाजपाने राहुल गांधी यांना शहजादा, राजकुमार म्हणून हिणवले पण त्यांनी जेव्हा एक पांढरा टीशर्ट घालून कन्याकुमारी ते काश्मीर अशी ४ हजार किमीची पदयात्रा केली तेव्हा १० लाखांचा सुट व महागडा चष्मा घालणाऱ्यांनाही घाम फुटला होता. राहुल गांधी यांनी जाती जनगणना या सरकारकडून करुन घेऊ असे जाहीरपणे सांगितले आणि भाजपाच्या सरकारला ते करावे लागले, ही राहुल गांधी यांची ताकद आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावे असेही ते म्हणाले.

देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या परिस्थितीत संविधान बनवून ते लागू करणे कठीण काम होते पण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दाखवले. आज तेच संविधान धोक्यात आहे. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली संसदेत प्रवेश करताना संसदेच्या पायऱ्यावर डोके टेकले होते आणि २०२४ येता येता त्यांनी संसदच बदलून टाकली. २०२४ साली मोदींनी संविधान डोक्याला लावले होते त्यामुळे पुढचा नंबर संविधानाचा आहे. आज घाबरलेले लोक सत्तेवर बसले आहेत, सत्तेच्या जोरावर ते ईडी, सीबीआय लावून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही घाबरत नाही, आम्ही प्रश्न विचारतच राहू. मुंबई अदानीला विकली जात असताना तुम्ही काय करत होता हा प्रश्न आपल्याला पुढची पिढी विचारेल..काँग्रेस पक्ष मुंबईला लुटू देणार नाही व संविधानालाही बदलू देणार नाही असा विश्वास प्रतापगढी यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या पवित्र संविधानाची २०१४ पासून गळचेपी सुरु आहे. सर्वच संस्थांचे स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे, न्याय व्यवस्थेकडेही लोक संशयाने पहात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा नेते संविधान बदलण्याची भाषा करत होते. कोणी म्हणाले संविधान जुने झाले ते अरबी समुद्रात बुडवा, काहीजण म्हणाले ४०० जागी विजयी करा संविधान बदलू. भाजपा सरकार संविधान मानत नाही हे संविधान वाचवण्याची गरज आहे.
राज्यातील भाजपा सरकारने जनसुरक्षा कायदा आणला आहे तो अदानी विरोधात आवाज उठवणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणला आहे. मुंबईच्या महत्वाच्या व मोक्याचा जागा अदानीला देण्याचा सपाटा सुरु आहे. धारावी, मोतालाल नगर, अभ्युदयनगर, मदर डेअरी, मिठागराची जमीन, सबकुछ अदानीला दिले जात आहे आणि त्याविरोधात आवाज उठवू नये म्हणून हा कायदा आणला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments