तळमावले/वार्ताहर : आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही केवळ महाराष्ट्रासाठीच नाहीतर जगभरातील शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. या 12 किल्ल्यांच्या नावातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अप्रतिम चित्र पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शब्दचित्रकार संदीप डाकवे यांनी साकारले आहे. हे चित्र तयार करत त्यांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे.
युनोस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये किल्ले शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, साल्हेर, खांदेरी या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे.
संदीप डाकवे यांनी किल्ल्यांच्या नावातून साकारले शिवाजी महाराज
RELATED ARTICLES