Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकराडमध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

कराडमध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न.

प्रतिनिधी :-राष्ट्रीय एनजीओ महासंघ संबंध संस्था शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन (महाराष्ट्र राज्य) शाखा- कराड व शेठ नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक ०१ मे २०२४ रोजी कराड येथील नगर परिषद शाळा क्रमांक ७/१२ येथे ठरलेल्या वेळेनुसार १२.३२ वाजता अनेक मान्यवरांच्या व प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी वधूवरांच्या समस्त आप्तेष्ट नातेवाईकांनी शाळेच्या पटांगणातील सजलेला भव्य मंडप गजबुजून गेला होता. वरांच्या मिरवणुकीच्या क्षणांनी बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. धार्मिक रीती रितीरिवाजाप्रमाणे वधू-वरांच्या लग्नविधीचे सर्व सोपस्कार करून वधू-वरांना विवाह पोषाख, वधूसाठी मनी मंगळसूत्र, जोडवे, संसार उपयोगी पाच भांडी अशा वस्तू देऊन उपस्थितांना जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. संसार सुखाच्या बंधनात प्रवेश करू पाहणाऱ्या नवदांपत्यास ज्येष्ठ व प्रतिष्ठित मान्यवरांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
यावेळी शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशन (महाराष्ट्र राज्य) सचिव मा.श्री विकासभाऊ सूर्यवंशी यांनी देणगीदार, हितचिंतक, उपस्थित वधूवरांचे नातेवाईक यांचे सर्वांचे मनापासून आभार मानले व सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील तळागाळातील गरीब, होतकरू, कामगार, कष्टकरी, अल्पभूधारक, आर्थिक दुर्बल घटकातील लोकांनी दरवर्षी असाच समुदायिक विवाह सोहळ्याचा आनंद घ्यावा व काळानुसार वाढत्या महागाईच्या पेचाला बळी न पडता कमी खर्चाचा मार्ग अवलंबून त्यांनी आपल्याच संसाराला हातभार लावावा.शंभूरत्न परिवर्तन फौंऊंडेशन ,(महाराष्ट्र राज्य) संचलित शाखा-कराड, पुणे- बेंगलोर हायवे,नांदलापूर ता.कराड येथे मो.नं.९५०३८००७७७ क्रमांकाशी संपर्क करून पुढील वर्षीच्या विवाह नोंदणीसाठी सतर्कता दाखवावी असे आव्हान केले. तसेच समाजातील दानशूरांनी असेच मदतीचे औदार्य दाखवून सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त केली.
हा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यासाठी शंभूरत्न परिवर्तन फौंउंडेशनचे सर्व पदाधिकारी व शेठ नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच मा. श्री सदाशिवराव बागल, मा. श्री भानुदास अण्णा वास्के, मा. श्री समीर जंगम, मा. ॲड. वर्षा माने, मा.ॲड. खतवाणी मा. श्री ॲड.पी.के. पाटील, मा.श्री ॲड. विकास पवार, मा. श्री विनायक वंजारी, मा. श्री दीपक दोडके, मा. श्री नरसिंहराव गायकवाड, कराड नगर परिषदेची शाळा क्रमांक ७/१२ चे मुख्याध्यापक मा. श्री विक्रमजी सपकाळ सर व मा. श्री सुहास आलेकरी सर व त्यांच्या सर्व सहकार्यांनी सहकार्य केले तसेच स्किल इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन सेंटर कराडचे मा. श्री शितल कुमार अर्धावर सर व त्यांची टीम यांचे सर्वांचे सहकार्य लाभले व सर्वांनी उपस्थित राहून सामुदायिक विवाह सोहळा आनंदाने पार पडण्यात आला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments