प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत बेलापूर भवन, से.11, सी.बी.डी. बेलापूर तसेच ऐरोली विभाग कार्यालय, से.3, ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या सल्ला केंद्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच गरजू महिलांवर होत असलेले अत्याचार, त्यांच्या कौटुंबिक व आर्थिक बिकट परिस्थितीबाबत मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तरी, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्टया दुर्बल तसेच गरजू महिलांनी समाज विकास विभाग कार्यालय, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन इमारत, 1ला मजला, से.11, सी.बी.डी., बेलापूर येथे अथवा ऐरोली विभाग कार्यालय, तळमजला, से.3, ऐरोली येथे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.