कोकण (शांताराम गुडेकर) : जिल्हा परिषद शाळा, करंबेळे तर्फे देवळे विद्यार्थिनी कु.स्वरा शशिकांत धावडे हिचे सर्वत्र अभिनंदनहोत आहे.कारण विद्यार्थीनी कु. स्वरा शशिकांत धावडे हिने सन २०२४-२५ मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५वी) अत्युच्च यश संपादन करून गुणवत्ता यादीत १६० वा क्रमांक पटकावण्याचा मान मिळविला आहे.
स्वराच्या या यशामध्ये तिचे वर्गशिक्षक व मुख्याध्यापक श्री.पाटील सर, पदवीधर शिक्षक श्री. सावंत सर, माजी शिक्षक श्री. मोहिते सर व सौ. पाटील बाई, तसेच तिचे वडील आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शशिकांत धावडे, आई शितल धावडे आणि भाऊ श्रेयस यांचे मौल्यवान मार्गदर्शन, प्रेरणा आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले.स्वराने घेतलेली मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यामुळेच तिने हे यश मिळवले आहे.
शाळेतील सर्व शिक्षक, पालकवर्ग, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदन करून पुढील शिक्षण व भविष्यकाळीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हा परिषद शाळा, करंबेळे तर्फे देवळे विद्यार्थिनी कु.स्वरा धावडे हिचे घवघवीत यश
RELATED ARTICLES