मुंबई (शांताराम गुडेकर) : आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.
गुरुपौर्णिमानिमित्त श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.१० जुलै २०२५ रोजी जी.के. एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी गुरु पौर्णिमा सोहळा साजरा केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयातील उपप्राचार्य प्राध्यापक श्री. प्रशांत तांदळे सर यांनी भूषवले. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य श्री.शफिक शेख सर,प्राध्यापिका सौ.रसिका लोकरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखविली.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केले.
विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच शिक्षकांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत व आभार व्यक्त केले.प्रथमेश पितांबरे,कुमारी भार्गवी पितांबरे,नीतू पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जी.के.एस.कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्यातर्फे गुरु पौर्णिमा सोहळा साजरा
RELATED ARTICLES