मुंबई (शांताराम गुडेकर) : जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगी नानारूपी कला अवगत असतात.कलाविश्वात अशी असंख्य उदाहरणे आहेत,असे अनेक कलावंत ह्या कलेवर आपल्या पोटाची खळगी,कुटुंबाचं उदरनिर्वाह करत जीवन जगत असतात.असा एक संयमी,नम्र,सरळ,साधं,नीरज कलावंत महेश मयेकर यांचं आज शुक्रवार ( दि.११ जुलै २०२५ ) रोजी रत्नागिरी येथे निधन झाले.
महेश मयेकर म्हणजे अनेकांना कल्पित असणारे व्यक्तिमत्व होते.मराठी,हिंदी व दक्षिणात्या चित्रपट मधून हुबेहूब आवाज काढण्याची एक अद्भुत कला ह्या कलावंताच्या अंगी होती.एकपात्री अभिनय करण्यात एक सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून आपल्या आयुष्यात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रम केले.सिनेस्टार चंदू मयेकर प्रस्तुत “धम्माल माझ्या आवाजांची” ह्या कार्यक्रमातून सादरकरता म्हणून महेशकुमार मयेकर प्रमुख भूमिकेत असत.वाढदिवस,स्वागत समारंभ अशा सोहळ्याप्रसंगी महेशकुमार यांच्या कार्यक्रमाला प्रचंड मागणी असे.एक – दोन वर्षेपूर्वी महेशकुमार यांनी नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष रविंद्रजी मटकर यांच्या ५० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपली कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
कलावंत महेशकुमार यांचे चिपळूणचे निवेदक/शाहीर शाहिद खेरटकर यांच्याशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते.महेश कुमारच्या आकस्मिक निधनाचे बातमीने माझं कुटुंबचं सुन्न झाले.महेश सोबतच्या अनेक आठवणी स्मरणीय राहतील महेशकुमार यांची लहानपणीचं आई निधन पावली मागोमाग बाबांचे देखील निधन अशा अनेक संकटांचा सामाना करत जगणारा हा कलावंत कायमच मनात राहील असे शाहीर शाहिदभाई खेरटकर यांनी मत व्यक्त केले.महेशकुमार यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी दुःखद पोकळी निर्माण झाली आहे.महेशकुमार अंतिम यात्रेला रत्नागिरीतील अनेक कलावंत उपस्थित होते.त्यांनी महेश मयेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बुलंद आवाजाचा बादशाह अनंतात विलीन कलावंत महेशकुमार मयेकर यांचं दुःखद निधन
RELATED ARTICLES