Wednesday, July 30, 2025
घरमहाराष्ट्रवडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....

वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस….

वडूज : सर्वसामान्य माणसांना दोन वेळचे जेवण मिळावे. यासाठी शासनमान्य रास्त भाव दुकानाची निर्मिती झाली. पण काळाबाजार आणि अनियमित्ता यामुळे अनेकांवर कारवाई सुद्धा होत आहे. खटाव तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज या ठिकाणी एका रास्त भाव दुकानाची तपासणी केली असता अनेक दोष आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दुकानदाराविरोधात खुलासा सादर करण्यासाठी नोटीस काढली आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज येथील रास्त भाव दुकानदाराची संलग्न जागरूक काही शिधापत्रिका वाटप धारकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खटाव तालुक्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी २७ जून रोजी सदर रास्त भाव दुकानाची तपासणी केली. रास्त भाव दुकानाला संलग्न शिधापत्रक दर्शनाला फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावला नव्हता. वजन- तराजू प्रमाणपत्र तपासणी वेळी दाखवली नाही. अन्न व औषध प्रशासना विभागाकडे प्रमाणपत्र तपासणी वेळी दाखवली नाही. जून ते ऑगस्ट २०२५ धान्य मंजुरी मधून विक्री वजा केले असता गहू ८.२४ क्विंटल व तांदूळ ११.४१ क्विंटल दुकानात जादा असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर तक्रारदार यांच्या शिधापत्रिका ऑनलाईन सात व्यक्ती असून सात व्यक्तींची पावती करण्यात येते. त्यापैकी प्रत्यक्षात चार व्यक्तींचे धान्य दिले जाते.
काही ठिकाणी १४ व्यक्ती असून १४ व्यक्तींचे पावती करण्यात येते. त्यापैकी प्रत्यक्षात पाच व्यक्तींना धान्य दिले जाते. रास्त भाव दुकानातून शिधा घेणाऱ्या लाभार्थ्यांशी सौजन्य वागत नाहीत. अशा लेखी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकारी, खटाव यांनी या रास्त भाव दुकान दुकानाची तपासणी केली. त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या. तक्रारदारांचा जाब जबाब नोंदवण्यात येऊन संबंधित दुकानदाराला त्यानंतर लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस काढण्यात आली.
जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ महाराष्ट्र अनुसूचित किरकोळ व्यापार परवाना आदेश १९७९ व शासनाचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार परिच्छेद क्रमांक ११ क्रमांक मधील तरतुदीचा भंग केल्या असल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे. केले असल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे त्यामुळे नोटीस पाठवण्यात आले आहे. सदर तक्रारदार हे दलित समाजाचे आहेत. तरीही त्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदाराच्या अनियमितेबाबत पुरावे सादर करून लेखी तक्रारीद्वारे पाठपुरावा केला. गोरगरिबांना मिळणाऱ्या शिधावर ताव मारणाऱ्या या रास्त भाव दुकानाचा शासनमान्य परवाना रद्द करण्याची मागणीही काही शिधापत्रिकाधारकांनी केलेली आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतल्याबद्दल तक्रारदारांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. संबंधित दुकानदार हा संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समजली आहे. खटाव तालुक्यातील पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी समाधान व्यक्त केले.

______________________________

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments