मुंबई : नायगांव-वडाळा विधानसभा क्षेत्राचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘श्री स्वामी समर्थ आरती संग्रह’ या भक्तिपर ग्रंथाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने मातोश्री निवासस्थानी संपन्न झाले.
या प्रकाशन सोहळ्यात शिवसेना नेते आणि खासदार श्री. अरविंदभाई सावंत यांनी ग्रंथाचे प्रकाशन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी सहनिरीक्षक श्री. सुरेश गणपत काळे, माजी शाखाप्रमुख श्री. संदीप चिवटे, गटप्रमुख श्री. कृष्णानंद भट, श्री. हरेश कामटे यांची उपस्थिती होती.
श्री स्वामी समर्थांच्या अध्यात्मिक परंपरेशी निष्ठा आणि भक्तिभाव वृद्धिंगत करणारा हा आरती संग्रह, भक्तांसाठी एक मौल्यवान देणगी ठरणार आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.