प्रतिनिधी : मौजे घोगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाजीराव नानासो तांबवेकर यांना सातारा कृषी विभाग यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून, त्यांच्या कार्याची अधिकृत पातळीवर दखल घेत गौरव करण्यात आला आहे.
कृषी विभाग सातारा यांनी प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करताना शेतीतील नविन तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन क्षमता, पिकांची विविधता, सेंद्रिय शेतीचा अवलंब, पाणी व्यवस्थापन यासारख्या बाबींची पाहणी करून त्यानुसार निवड केली. या निवड प्रक्रियेत श्री. तांबवेकर यांनी आपली उल्लेखनीय कामगिरी सिद्ध करत तृतीय क्रमांक पटकावला.
हा गौरव म्हणजे घोगाव ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असेही मत स्थानिकांनी व्यक्त केले.