Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रजगदगुरू शंकराचार्यांच्या हस्ते ‘शंकरालयम’वर महाकुंभाभिषेकम

जगदगुरू शंकराचार्यांच्या हस्ते ‘शंकरालयम’वर महाकुंभाभिषेकम

प्रतिनिधी :  वेद मंत्रांच्या घोषात आणि होमकुंडाच्या पवित्र अग्नितून प्रज्वलित झालेल्या ऊर्जेत जगदगुरू बदरी शं‍कराचार्यानी चेंबूरच्या हरिहरपुत्र भजन समाज संचलित ‘शंकरालयम’मध्ये तृतीय जीर्णोद्वार महाकुंभाभिषेकम केले.

यापुर्वी २००२ आणि २०१४ साली आद्य जगद्‌गुरू बदरी शंकराचार्य श्री विद्याभिनव श्री श्री कृष्णानंद तीर्थ महा स्वामीगळ श्री क्षेत्र शकरपुरम (कर्नाटक) यांच्या हस्ते शंकरालयम येथे महा-कुंभाभिषेकम करण्यात आले होते. महाकुंभाभिषेकम सोहळ्याचे धार्मिक विधी पुरोहित ब्रम्हश्री लक्ष्मीनारायणा सोमय्याजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. दिल्लीतील संसदेतील उद्घाटनाची पुजाही ब्रम्हश्री सोमय्याजी यांनीच केली होती. महाकुंभाभिषेकम पुर्व सोहळ्याची धार्मिक पुजा रामासुब्बू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

या ऐतिहासिक घटनेचे साक्षी होण्यासाठी हजारो भाविकानी गर्दी केली होती. आद्य श्री शंकराचार्यानी या शंकरालयाला ‘प्रति शबरीमाला’ असे संबोधले आहे. तेथील धर्म सस्थ म्हणजेच श्री अय्यप्याची मूर्ती ही तितकीच सामर्थ्यवान असल्याचे प्रतिपादन केले आहे. ज्या भक्त-श्रद्धाळूंना केरळमधील अय्यपाच्या म्हणजेच शबरीमाला सारख्या पवित्र स्थानी जाणे शक्य होत नाही त्यांनी ‘शंकरालया’ला भेट देऊन आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात असा सल्ला आद्य श्री शंकराचार्य यांनी दिला आहे.

“शंकरालयम- श्री हरिहरपुत्र भजन समाज (रजि) यां मुंबईतील चेंबूर या उपनगरातील संस्थेच्या चार मजली भव्य अशा प्रसादरूपी इमारतीमध्ये शंकरालयाची स्थापना २००२ साली करण्यात आली. या मंदिरामध्ये धर्म आस्था (अध्याया), एकम्बरेश्वरार (शिवा) भाणि कामाक्षीदेवी अशा तीन देवतांचा अधिवास आहे. ‘शंकरालय’ हे अर्थातच देवत्व आणि अध्यात्मिकता यासाठी सुपरिचित आहे. येथे चालणारे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम हे जनतेच्या कल्याणासाठी-उत्थानासाठी नियमितपणे राबविले जातात.

या सोहळ्यास भारताचे अॅटर्नी जनरल आर वेंकटरमणी, , त्रावणकोर राजघराण्याच्या यूवराज्ञी आणि तिरुवनंतपुरमची महाराणी, श्रीमती थंब्रत्ती, भारताचे माजी शास्त्रीय सलागार डॉ. आर. चिदंबरम्, शापूरजी आणि पालनजीचे व्यवस्थापकीय संचालक शापूरजी, श्री षण्मूरखानंद फाईन आर्टस आणि संगीत सभाचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर, महिंद फायनान्स लिमिटेड व्यवस्थापकीय संचालक रमेश अय्यर , ऑटोटेक इंडस्ट्रिज-चेन्नईचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. जयरामन, अॅपकॉन्सचे उपाध्यक्ष डॉ. के. सुब्रमणियन, व्यवस्थापकीय संचालक एस. परमसिवन, रेडियन्स रिन्युएबल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिकन संगमेश्वरम, अखिल भारतीय अय्याप्पा धर्म प्रचार सेवा समितीचे अध्यक्ष अय्यप्पा दास, रेडी टू वेट महिला संघटनेच्या पद्‌मा पिलुई, मेळ शान्ती समाजमचे अध्यक्ष शशी नम्बुथिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments