Friday, August 1, 2025
घरमहाराष्ट्रकोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण व्यक्तींना "कोकण युवा सन्मान पुरस्कार...

कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण व्यक्तींना “कोकण युवा सन्मान पुरस्कार २०२५” पुरस्काराने होणार गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर) : कोकणच्या मातीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तुत्वान व्यक्तींना एकत्र आणत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत , आम्ही कोकणकर संघटनेच्या वतीने कोकण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे‌. हा रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता श्री शिवाजी नाट्यमंदिर , दादर (मुंबई) येथे संपन्न होणार आहे.
आम्ही कोकणकर ही संघटना गेली दहा वर्षे कोकणातील तरुण पिढीला एकत्र आणत , कोकणच्या सांस्कृतिक , सामाजिक आणि कलात्मक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे. विशेषत: कोकणातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना योग्य संधी मिळून देण्यासाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे. “कोकण सन्मान सोहळा” या कार्यक्रमाद्वारे कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण व्यक्तींना “कोकण युवा सन्मान पुरस्कार २०२५” हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. कार्यक्रमात धमाल, मस्ती, कॉमेडी, प्रबोधनपर, मनोरंजन आणि कोकणवासीयांसाठी खास सांस्कृतिक सादरीकरण पाहायला मिळणार आहे.या सोहळ्यात मनोरंजन म्हणून गर्जना- कहाणी हिंदुत्वाची ही नाट्यकला कृती दाखवण्यात येणार आहे. कोकण सन्मान सोहळा रसिक प्रेक्षकांसाठी मोफत असून कोकणवासीयांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आव्हान संघटनेचे संस्थापक /लेखक /दिग्दर्शक कृष्णा नंदा शांताराम येद्रे यांनी केले आहे.चला एकत्र येऊन साजरा करूया उत्सव कोकण संस्कृतीचा..!कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका व अधिक माहितीसाठी ९७७३१४२८१९ /८६५२१४१५६१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments