Wednesday, July 30, 2025
घरमहाराष्ट्रशाहीर तुषार मधुकर पंदेरे यांना "प्रा. डॉ. आनंद गिरी तुराभूषण पुरस्कार-२०२५"जाहीर

शाहीर तुषार मधुकर पंदेरे यांना “प्रा. डॉ. आनंद गिरी तुराभूषण पुरस्कार-२०२५”जाहीर

मुंबई(शांताराम गुडेकर) : प्रा. डॉ. आनंद गिरी हे आभाळाची उंची गाठलेले अन् तरी देखील जमिनीशी घट्ट नातं जपणारे रसिक कलावंत अभ्यासक आहेत. गिरी हे पश्चिम महाराष्ट्रात लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकरिता सुपरिचित असून ते गेली ४३ वर्षे सातत्याने लोककला व भेदिक शाहिरीच्या संवर्धनासाठी शाहिरी महोत्सव व या विषयांवर जवळपास २० हून अधिक मौलिक अशी ग्रंथसंपदा प्रसिद्ध करून मौखिक परंपरेला लिखित स्वरूपात जपण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहेत.गिरी यांना पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा या संस्थेचा २०२३ चा पहिला ‘जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना सन्मानितकरण्याचे भाग्य लाभलेहे संस्थेसाठीलाख मोलाचे आहे. या पुरस्कार सोहळ्यात मंडळाच्या वतीने प्रा. डॉ. आनंद गिरी यांच्या गौरवार्थ भेदिक शाहिरीतील नव्या-जुन्या पिढीतील शाहीरांना गिरी यांच्या नावे पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्याचा विचार पुढे आला.२०२५ चे पुरस्कार पुढील शाहिरांना जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.१३ जुलै २०२५ रोजी “लोकसंस्कृतीचा आनंदयात्री कृतज्ञता सोहळा – पर्व २” या कार्यक्रमात होणार आहे.कार्यक्रम किल्ले पन्हाळगड, कोल्हापूर येथे होणार आहे.यामध्ये जीवनगौरव पुरस्कार – २०२५ मा. श्री. अंकुश तेलंगे (गिर्यारोहक, कोल्हापूर),प्रा. डॉ. आनंद गिरी कलगीसम्राट पुरस्कार -२०२५ शा. विठ्ठल पाटील (मांडूकली, गगनबावडा),प्रा. डॉ. आनंद गिरी लोककलाभूषण पुरस्कार -२०२५ शाहिर संपत कदम (तुंग, सांगली),प्रा. डॉ. आनंद गिरी जीवनगौरव पुरस्कार -२०२५ शाहिर. पंढरीनाथ मोरे (बीडकर महाराज),प्रा. डॉ. आनंद गिरी तुराभूषण पुरस्कार -२०२५ शाहिर. तुषार पंदेरे (लांजा, रत्नागिरी),प्रा. डॉ. आनंद गिरी शाहीर पंडित पुरस्कार-२०२५ शाहीर. संजय गुरव (कोल्हापूर),शाहिर. शिवाजीराव शिंदे (अहिल्यानगर),प्रा. डॉ. आनंद गिरी शाहीरी गौरव पुरस्कार -२०२५ शाहिर. सोमाजी वाघ (मिणचे, हातकणंगले), शाहिर. बाळासो खांडेकर ( बीड, करवीर)यांचा समावेश आहे असे पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा यांनी बोलताना सांगितले.
कोकण सुपुत्र शाहीर तुषार पंदेरे यांना ३२ वर्षाच्या लोककला प्रवासमधील पहिला पुरस्कार महाराष्ट्र कलगी- तुरा शाहिरी भूषण पुरस्कार हा कलगी तुरा उन्नती मंडळ मुंबई मार्फत देण्यात आला होता. त्यानंतर २०२५ मधील हा दुसरा प्रा. डॉ. आंनद गिरी तुरा भूषण पुरस्कार प्राप्तहोणार आहे. गुरुवर्य, वस्ताद आणि कोकणच्या रसिक मायबाप प्रेक्षक तसेच ज्यांनी -ज्यांनी पंदेरे शाहिराला कलगी तुरा, भेदीक शाहिरी, नमन, पोवाडे कला क्षेत्रात मोलाचे सहकार्य केले.त्यांचे शाहीर तुषार पंदेरे यांनी यानिमित्ताने धन्यवाद व्यक्त केले आहेत.कोकण सुपुत्र शाहीर तुषार पंदेरे यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकणातील अनेक कलगी-तुरा शाहीर, नमन मंडळ, शक्ती -तुरा मंडळ, विविध संस्था, ग्रामीण /मुंबई मंडळ, समाज शाखा, मंडळ यांनी शाहीर तुषार पंदेरे यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.
पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर आयोजित लोकसंस्कृती अभ्यासक डॉ. प्रा.आनंद गिरी गौरवार्थ लोकसंस्कृतीचा आनंदयात्री सोहळा – पर्व २ या
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विनयरावजी कोरे
(आमदार, पन्हाळा – शाहूवाडी) उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अदि.रामचंद्र प्रसिद्ध सिने व नाट्य संगीत दिग्दर्शक पुणे जबाबदारी संभाळणार आहेत. यावेळी श्री. सतीश घारगे (सुप्रसिद्ध शिल्पकार, कोल्हापूर)यांची प्रमुख उपस्थितीलाभणार आहे. शिवाय श्री. विश्वास पाटील (भाऊ) (अध्यक्ष – सुरभी संघटना, आपटी),प्रा. डॉ. चंदा सोनकर प्राध्यापक व हिंदी अनुवादक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हेही उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शिवप्रसाद शेवाळे अध्यक्ष- प. इ. स. मंडळ, पन्हाळा,श्री. आशिष पाटील युवा नेते, पन्हाळा बांधारी,श्री.संतोष चव्हाण सामाजिक कार्यकर्ते आणि संयोजक-मा. अमित देसाई,मा. मृणाली शेटे,मा. रणजीत शिपुगडे,मा. ऋतुराज काशिद,मा. स्वप्नील पाटील,पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा विशेष परिश्रम घेत आहेत. कार्यक्रम सूत्रसंचालक श्री. प्रल्हाद पाटील (प्रसिद्ध गायक व सूत्रसंचालक)करणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments