प्रतिनिधी : सायन रेल्वे स्थानकाजवळील संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या स्मारकावर कोणतीही पूर्वसूचना न देता मनपाने कारवाई केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. धारावी पोलिसांना याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नसून, केवळ खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. सोमवार, ७ जुलै रोजी दुपारी अचानक हे स्मारक हटवण्यात आले. ना नोटीस, ना जाहिरात—या गोष्टींमुळे चर्मकार समाजात संभ्रम व संताप निर्माण झाला आहे.या प्रकाराविरोधात मंगळवार, ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सायन स्थानकासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. स्थानिक चर्मकार समाजातील नागरिकांचे म्हणणे होते. रेल्वे प्रशासन यांनी स्मारक हटवताना स्थानिक राजकीय पक्ष व पोलीस ठाण्याला पूर्वसूचना देणे आवश्यक होते, असा आरोप केला आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी उपविभागप्रमुख गणेश खाडे यांनी आंदोलन करत निषेध नोंदवला.
सायन येथे संत रोहिदास महाराज स्मारक हटविल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन
RELATED ARTICLES