प्रतिनिधी : ओम शिवराष्ट्र नर्सिंग कॉलेज, शिवाजीनगर, घोगाव (ता. कराड) यांच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री संत कृपा मंदिर परिसरात महावृक्ष दिंडी व वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता विठ्ठल-रुक्मिणी अभिषेकाने झाली. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत दिंडीसोहळा आणि वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी १२ वाजता महाआरतीने समारोप झाला.
या प्रसंगी तहसिलदार तथा दंडाधिकारी मा. सौ. कल्पना ढवळे-भंडारे, बीडीओ मा. श्री. प्रतापराव पाटील, मंडळ अधिकारी मा. सौ. शितल अर्जुन सुतार, तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय बजरंग भावके,प्राचार्य श्वेता संजय भावके यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दिंडी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचेही कार्य यावेळी करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुयोग्य नियोजनात पार पडला.